हाथरस : उत्तर प्रदेश मधील येथील हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. 121 जणांचा जीव गेला आहे. हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ? उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा याच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या समोर आलेल्या फोटोंनी केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर संपूर्ण देशाला मोठा हादरा बसला आहे. घटनास्थळी पडलेला मृतदेहांचा ढीग अपघाताची गांभीर्य सांगत होते. हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टम हाऊसमधील आरडाओरडा काळजाला वेदना देणारा होता.