Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी हिअरिंग पूर्ण; या संदर्भातील ऑर्डर लवकरच येण्याची शक्यता!

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 9, 2025
in बातमी
0
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी हिअरिंग पूर्ण; या संदर्भातील ऑर्डर लवकरच येण्याची शक्यता!
       
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद!

औरंगाबाद : परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी झालेल्या सुनावणीत, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत कायद्यात अपूर्णता असल्याचे अधोरेखित करण्यात आले. याबाबत कायद्यातील तरतूद पूर्ण करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

यावर आंबेडकर म्हणाले, कायद्यातील तरतुदी पर्ण करावी ही आमची ठाम मागणी होती, जी न्यायालयाने समजून घेतली असून याबाबत “कायदा असला पाहिजे” असे स्पष्ट मत मांडले आहे.

तसेच या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची आंबेडकर यांनी दुसरी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्याने पोलिसांकडून चौकशी न होता स्वतंत्र SIT द्वारे तपास व्हावा, ही आमची भूमिका न्यायालयाने ऐकून घेतली आहे. लवकरच यासंदर्भातील आदेश अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली आहे. या संदर्भात दोन स्वतंत्र आदेश येण्याची अपेक्षा आहे. कायद्यातील त्रुटी दूर करण्यासंदर्भातील तसेच SIT नेमणुकीसंदर्भातील या संदर्भात न्यायालय काय भुमिका घेणार याकडे आता लक्ष असेल. तसेच या प्रकरणाचा जो निर्णय येईल तो निर्णय देशभरातील न्यायालयीन कोठडीत होणाऱ्या मृत्यू प्रकरणांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

Tags: casecome sooncompletedeathHearinglikelyOrderregardSomnath Suryavanshi
Previous Post

समृद्ध लोकशाही उभारण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग – भास्कर भोजने

Next Post

मुंबईत मुंब्रा लोकल रेल्वे अपघात, 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

Next Post
मुंबईत मुंब्रा लोकल रेल्वे अपघात, 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

मुंबईत मुंब्रा लोकल रेल्वे अपघात, 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home