मुंबई : राज्यातील मराठी शाळांबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून, गेल्या दोन वर्षांत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत तब्बल 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. या धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Marathi Granted Classical Status)
मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला नाही तसेच त्याबाबत कोणतेही धोरण आखण्यात आलेले नाही. दोन हजार मराठी शाळा अडचणीत असून 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. (Marathi Granted Classical Status)
मात्र, इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला वाढती पसंती मिळत असल्याने 255 शाळा बंद झाल्याची कबुली त्यांनी दिली. दरम्यान, काही अहवालांनुसार राज्यातील सुमारे 620 शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे हजारो शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 70 गावांत ‘ना शाळा, ना पाटी-पेन्सिल’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचीही चर्चा आहे. (Marathi Granted Classical Status)
ग्रामीण भागातील शाळा सर्वाधिक प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सरकारने उत्सव साजरा केला; मात्र प्रत्यक्षात मराठी शाळा वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका विविध स्तरांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखावे, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ आणि पालकवर्गातून जोर धरत आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून ‘क्लीन चीट’
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या राजकारणात आज एक मोठी बातमी समोर आली आहे. बहुचर्चित 'मद्य धोरण घोटाळा' प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री...
Read moreDetails






