Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सांस्कृतिक

मास्टरमाईंड

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 8, 2021
in सांस्कृतिक
0
मास्टरमाईंड
       

इफांळ किंवा सिडनी येथील हवामान कसे आहे? जगामधील कोणत्या ठिकाणी सर्वात मोठी सूर्यफूले उगवतात? अथवा ताश्कंद व कराची या शहरांमधील सर्वात जवळचा मार्ग कोणता? या प्रश्नांची उत्तरे आजकाल सिरी आणि अलेक्सा सारखे प्रि-प्रोग्राम (संगणकाची पूर्व नियोजित आज्ञावली) केलेले बॉट्स (इंटरनेट वरील सांगकामे) आपल्याला देतात. शालेय विद्यार्थ्यांच्या तरुण पिढीने फोनवर त्यांचे प्रश्न ‘बोलणे’ आणि सिरी किंवा अलेक्साच्या योग्य प्रतिक्रियेची वाट पाहणे अनुचित नाही. ज्यांनी हा २१ व्या शतकाचा नवीन खेळ पाहिला आहे किंवा खेळण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना समजेल की, हे एकाच वेळी चिंताजनक आणि मनोरंजक आहे. जेव्हा माझ्या मुलाने मला या ‘व्हॉईस बेस्ड सर्च सिस्टीम’ची (आवाजावरून माहिती शोधण्याच्या प्रणालीची) ओळख करून दिली तेव्हा माझी अवस्था काहीशी ७ जुलै १८९६ रोजी बॉम्बेच्या वॉटसन हॉटेलमधून चित्रपट पडद्यावरील ट्रेन पाहून पळ काढणाऱ्या लोककथेतील जनसमुदाया सारखी झाली असावी. हा संदर्भ चित्रपटाच्या इतिहासामध्ये बनविलेल्या अगदी प्रारंभीच्या चित्रपटाबाबतचा आहे, ज्याचे नाव “अरायवल ऑफ अ ट्रेन” (ट्रेनचे आगमन)  असे होते. ऑगस्टे आणि लुईस ल्युमेअर या बंधूनी वरील चित्रपटाची निर्मिती पॅरिसमध्ये केल्यानंतर महिनाभरातच जगातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरात तो दाखवण्यात आला होता. रेल्वे स्टेशन वर वेगाने येणारी ट्रेन याआधी प्रेक्षकांनी पूर्वी कधीही पहिली नव्हती. पडद्यावरती अशा चलप्रतिमा कधीही पहिल्या गेल्या  नव्हत्या. त्या चल -प्रतिमा पाहून अंगावर ट्रेन येईल या भीतीने  प्रेक्षक पडद्यापासून पळून गेले.

भविष्यात सिरी आणि अलेक्सा सारख्या बॉट्सवरती आपले अवलंबित्व वाढणार असल्यामुळे तो अतीव चिंतेचा विषय बनला आहे. तंत्रज्ञानी आणि प्रोग्रामर यांनीच हाताळण्याचा हा विषय राहिला नाही तर जन समुदाय, भाषातज्ज्ञ आणि विविधतेच्या संरक्षणामध्ये रस असणारे यांच्याकडून सक्रिय वादविवादाची अपेक्षा केली जात आहे. हे माहिती देणारे बॉट्स जणू आपल्या वैयक्तिक जनुकांप्रमाणे कार्य करत असतात. त्यांच्या अनुभूतीमधून भाषेचे मानवी जीवनात आणि एकूणच समाजात काय स्थान आहे याविषयी विचार करण्यास मी बाध्य झाले आहे. यातूनच मी खूप वर्षांपूर्वी पाहिलेला आणि बर्‍याचदा माझ्या विद्यार्थ्यांना दाखविलेला एक थरकाप उडवणारा चित्रपट आठवतो आहे. हा दिग्दर्शक जीन ल्यूस गोडार्ड यांचा १९६५ सालचा फ्रेंच चित्रपट आहे. दिग्दर्शक जीन ल्यूस गोडार्ड यांना अनेकजण महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानतात व ते १९६० च्या काळात उदयाला आलेल्या “फ्रेंच न्यू वेव” (फ्रांस मधील नवी लाट) या चळवळीचे महत्त्वाचे व्यक्ती होत. वर उल्लेख केलेल्या चित्रपटाचे नाव अल्फाविल आहे. हा चित्रपट अल्फाविल या काल्पनिक शहरावर बेतला आहे जे अवर्णनीय गोदामे असलेल्या आणि सोडून दिलेल्या औद्योगिक शहरासारखे भासते. विराण जागा आपण ज्याला म्हणतो तसे हे शहर आहे.  काळ्या आणि पांढऱ्या रंगात चित्रित झालेल्या चित्रपटामधील आवाज,  त्यातील जागा कंटाळवाण्या आणि उदास आहेत. विशेषत: काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये चित्रीत करण्यात आलेले चित्रपट ‘फिल्म नॉयर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या चित्रपट शैलीशी संबंधित आहेत जी निराशावादी अथवा प्राक्तनवादी मनोविश्वाचे दर्शन घडवते.

अल्फाविल हे तांत्रिक ठिकाण आहे जिथे लोकांवर अल्फा ६० नावाच्या संगणकाद्वारे शासन केले जाते. एडी कॉन्स्टँटाईन या अभिनेत्याने साकारलेला लेम्मी कॉशन नावाचा, ट्रेन्च कोट परिधान करणारा गुप्त एजंट त्याच्या  मिशनसाठी अल्फाविलला भेट देतो आणि तेथेच हॉटेलमध्ये राहतो. हॉटेलमध्ये त्याच्या बिछान्याशेजारी बायबल नावाचे पुस्तक आहे. खरे तर हे बायबल म्हणजे धर्मग्रंथ नव्हे. तो एक शब्दकोश आहे. हा कोणताही सामान्य शब्दकोश नाही. अल्फा ६० च्या आदेशावरून यातील शब्द नियमितपणे काढून टाकले जातात. काढून टाकलेल्या शब्दांपैकी “व्हाय” (का) हा एक शब्द आहे. याचा परिणाम म्हणून अल्फाविल मधील रहिवाशी कधीच प्रश्न विचारण्यास शिकले नाहीत. हे जरी अकल्पनीय वाटत असले तरी, नागरिकांना प्रश्न विचारण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही एकाधिकारवादी राजवटीची अशीच मुख्य रणनीती असते. आपल्याला माहितच आहे, नागरिकांनी प्रश्नच विचारू नये ,अशी परिस्थिती बऱ्याच मार्गांनी साध्य करता   येते. सेन्सरशिपद्वारे (मुद्रण परीवेक्षण) हे साध्य केले जाते. दबावतंत्र वापरून हे शक्य होते, व्हॉट्सअ‍ॅप आणि भारत सरकार यांच्यात नुकताच झालेला सामना उदाहरणादाखल आठवावा. सरकार विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी करून हे साध्य होते, जे  विद्यमान एनडीए सरकार करत आहे. संवाद व संप्रेषण  तंत्रज्ञानाचा वापर नाकारून हे साध्य करत येते जे काश्मीरमध्ये बऱ्याच महिन्यापासून सुरू आहे. अल्फाविलमध्ये भाषेमधून तेथील यंत्रणेला समस्याग्रस्त असलेले शब्द काढून हे साध्य केले जात होते. ज्याद्वारे कोणी प्रश्न विचारू शकतो असे शब्दच नसतील, तर प्रश्नच विचारले जाणार नाहीत. यातूनच एखाद्याचा आवाज शांत केला  जातो.

प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री असलेली अॅना कॅरिना हिने चित्रपटात हॉटेल परिचर असलेली आणि अल्फा ६० मागील मास्टरमाईंड (सूत्रधार) प्रो. वॉन ब्राउन यांची मुलगी नताशा हिची भूमिका साकारली आहे. गोडार्ड यांच्या चित्रपटनिर्मितीच्या शैलीला साजेसं नसणारे भावनाक्षोभक वळण कथानकात आहे. माणूस कमी आणि ऑटोमेटॅान (मशीन सारखे काम करणारी) जास्त अशी असणारी नताशा गुप्तहेर एजंट लेम्मी कॉशनच्या प्रेमात पडायला लागते. आपल्याला माहित नाही दिग्दर्शक हेतुपूर्वक नावाच्या उच्चारावर खेळत आहे कि नाही. परंतु इंग्रजीतील ‘लेट मी कॉशन’ (मला सावध करू द्या) याचे जलद वचन केल्यावर लेम्मी कॉशन हे गुप्तहेराचे नाव ध्वनित होते. खरे तर भाषेच्या ऱ्हासातून होणाऱ्या चिकित्सक क्षमतांच्या ऱ्हासाच्या धोक्याकडे गोडार्ड यांचा गुप्तहेर अर्ध्या शतकापासून आपणास सावध करत असावा. चित्रपटातील एका अविस्मरणीय प्रसंगामध्ये लेम्मी कॉशन नताशाला ‘प्रेम’ हा शब्द माहीत आहे की नाही ते विचारतो. एखादी भाषा ज्ञात नसलेला जसे उच्चारण करतो तसे नताशा ‘प्रेम’ या शब्दाचे उच्चारण करण्याचा प्रयत्न करते. अर्थातच, तिने तो शब्द कधीच ऐकलेला नसतो. तरीही तो शब्द तिच्या जिभेवर रेंगाळत राहतो जसे की, त्याची चव ती घेऊ शकणार होती. जस-जशी नताशाला तिच्या स्व-विषयी अधिकधिक जाणीव होते तस-तशी तिच्यामधील एकसाची प्रोग्राम केलेल्या ऑटोमॅटॉन सारखी असणारी प्रवृत्ती कमी होत जाते. ती स्वतःच्या भावना व्यक्त करायला लागते ज्यांची भाषा मात्र तिच्याकडे नसते. सुरवंट फुलपाखरू होण्यासाठी जसे धडपडते तशी तिची धडपड सुरू असते. शेवटी तिच्या घशातून शब्द बाहेर येतातच. “माझे तुझ्यावर प्रेम आहे”!

तंत्रज्ञानशाही व फॅसिस्ट सरकार ज्या प्रकारे इंटरनेट, माध्यम आणि दळणवळण तंत्रज्ञानावर नियंत्रण  मिळवण्यासाठी हालचाली करत आहेत त्यातून असे दिसते की, येणाऱ्या भविष्यात ते सिरी आणि अलेक्सा सारख्या बॉट्सवरदेखील नियंत्रण मिळवण्यास इच्छुक असतील. या बॉट्सवर आपली तरुण पिढी अधिकाधिक विसंबून असेल. येणाऱ्या काही वर्षांत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यात आपण या बॅाट्स’ना भारताच्या राज्यघटनेतील सरनामा काय आहे असे विचारू तेव्हा ते उत्तर देतील, “अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही”. जर आपण विचारत राहिलो की भारत देश, ‘समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे की नाही’? बॅाट्स म्हणतील, “हे शब्द अनोळखी आहेत”. आपण परत त्यांना राज्यघटनेविषयी विचारू तर ते “ती एक मिथक आहे” असे म्हणतील. आपण अधिकार, समता, न्याय याबाबत विचारात राहिलो तर ते म्हणतील, “खूप सारे चुकीचे प्रयत्न, आपली प्रणाली बंद पडली”….

लेखिका :रश्मी सहानी

अनुवादक :पृथ्वीराज शिंदे


       
Tags: cinemareviewmastermindrashmisahney
Previous Post

पलूस तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा वंबआ’त प्रवेश

Next Post

आंबेडकरी राजकारणाचा परिघ विस्तारला !

Next Post
आंबेडकरी राजकारणाचा परिघ विस्तारला !

आंबेडकरी राजकारणाचा परिघ विस्तारला !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎
बातमी

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

by mosami kewat
July 6, 2025
0

कर्नाटक : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर कर्नाटकात अनुसूचित जातींच्या (SC) संदर्भात बनावट सर्वेक्षण करत असल्याचा...

Read moreDetails
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

July 6, 2025
Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

July 6, 2025
Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण ; मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेची माफी मागावी

Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण ; मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेची माफी मागावी

July 6, 2025
तिसऱ्या भाषेच्या सक्तीला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरही साधला निशाणा‎

तिसऱ्या भाषेच्या सक्तीला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरही साधला निशाणा‎

July 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क