Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home संपादकीय

प्रबुद्ध समाजासाठी एक व्हा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 14, 2021
in संपादकीय
0
       

संवादाची माध्यमे बदलली परंतु, प्रिंट मीडियाचं अजूनही वर्चस्व संपलेल नाही. माध्यमांमध्ये रेडिओ, टीव्ही, नव माध्यमे आली.  त्याचे वेगवेगळे प्रकार आले. यात माध्यमे प्युअर फॉर्ममध्ये राहिलेली नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० मध्ये “मूकनायक”  या आपल्या वर्तमानपत्राची जाहिरात केसरीमध्ये देण्याचा प्रयत्न केला होता.  त्यासाठी त्यांनी केसरीमध्ये जाहिरात देण्यासाठी पैसेही पाठविले पण, केसरीने ती छापली नाही. या घटनेला आज अनेक वर्षे झाली पण,  वर्तमानपत्रे बदलली आहेत असे आजही दिसत नाही. आजही माध्यमांमधील दुजाभाव कायम आहे. फक्त ती मांडण्याची भाषा बदलली आहे पण, त्याचा अर्क आजही तसाच राहिलेला आहे.

“प्रबुद्ध भारत” आणि तत्सम पाक्षिक ह्यांनी मुख्य प्रवाहातील मीडियाला बदलायला लावलं आणि नवीन व्यवस्थेच्या बाजूने उभे राहण्यास भाग पाडले. सध्याच्या स्थितीत मुख्य प्रवाहातील माध्यमांचा दुजाभाव अधोरेखित झालेला आहे. मग तो प्रिंट मीडिया असो की टेलिव्हिजन मीडिया असो. २ – जीचा मोठा घोटाळा झाला. तो त्याच पद्धतीने रंगवण्यात आला. ते योग्य की अयोग्य?  हा इतिहास सांगेल पण, माझ्यादृष्टीने राईचा पर्वत करण्यात आला. तशाच पद्धतीचा फ्रॉड राफेल विमान खरेदीमध्ये झाला. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या संस्थेने १ मिलियन युरो  इतकी लाच या खरेदी व्यवहारामध्ये एका मध्यस्थाला देण्यात आली. अशी माहिती जाहीर केली. त्याची अनेक वर्तमानपत्रांनी बातमी केली नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्राईम टाइमचा विषय तो झाला नाही. दोन्हीही घोटाळे राष्ट्रीय दृष्टिकोनातून देशाच्या हितसंबंधाचे होते.

यातून ‘प्रबुद्ध भारता’च्या वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, जोपर्यंत ‘प्रबुद्ध भारत’ सारखे पाक्षिक आपण जिवंत ठेवत नाही, तोपर्यंत मेनस्ट्रीम मीडियावरती अंकुश ठेवता येणार नाही. जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया की, प्रबुद्ध भारतचे वार्षिक वर्गणीदार होऊ आणि ते सतत सुरु राहील यासाठी सहकार्य करत राहू.


       
Tags: ambedkarjayantibabasahebambedkarnediaprabuddhbharatVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स

Next Post

घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा

Next Post
घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा

घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’
क्रीडा

अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’

by mosami kewat
February 6, 2026
0

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक !  Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले...

Read moreDetails
अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

February 6, 2026
Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

February 6, 2026
अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

February 6, 2026
स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती

स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती

February 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home