Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

आंबेडकरी राजकारणाचा परिघ विस्तारला !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 12, 2021
in विशेष
0
आंबेडकरी राजकारणाचा परिघ विस्तारला !
       

भारतीय राजकारणात सत्ताधारी कॉग्रेस पक्षाने जातीचा वापर करून लोकशाहीचा पुरता विचका केला आहे. कॉग्रेस पक्षाने जातीचा वापर केला म्हणून भाजपने धर्माचा वापर करून सत्ता मिळविली आणि लोकशाही खिळखिळी केली. सर्वच प्रसार माध्यमे आपल्या हातात कशी राहतील याची तजवीज करीत विषमतावादी विचारांच्या मुठभर लोकांनी प्रसार माध्यमांच्या सहाय्याने जनमानसाच्या मनात जातीयवादी,आणि धर्मवादी विचार पेरायला सुरुवात केली आणि म्हणून मग राजकीय पुढा-यांना जातीच्या कोंडवाड्यात बंदिस्त करीत राजकारणात जातीने धुमाकूळ घातला.त्याचा परिणाम असा झाला की, लहान, लहान जातीच्या होतकरू,कष्टाळू नेतृत्वाचे राजकारण संपुष्टात आले, प्रत्येक राज्यात जी जात संख्येने मोठी असेल त्यांची राजकारणात चलती सुरू झाली आणि चोर पावलांनी घराणेशाही रुजू झाली.

एकच उदाहरण आणि एकाच राजकीय पक्षातील देतं आहो त्यावरुन भाजप, कॉग्रेस आणि सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षातील मनुवाद चटकन लक्षात येईल. अतिशय कष्टाळू आणि आपल्या कार्याच्या जोरावर राजकारणात पुढे आलेले गोपीनाथ मुंडे यांना ओबीसी नेते म्हणूनच मीडियाने संबोधले ते सर्वांचे नेते होऊ शकले नाही ,आणि त्यांना मुख्यमंत्री पद ही मिळू शकले नाही मात्र मुठभर लोकसंख्या असलेल्या आणि कुठलेही भरीव कार्य नसलेल्या फडणवीसांना सहज मुख्यमंत्री पद आणि भारतीय नेते म्हणून मान्यता मिळाली हा फरक सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे.अशा राजकीय काळात प्रखर लोकशाहीवादी मात्र संख्येने अल्प असलेल्या आंबेडकरवादी राजकारणाची पुरती दमशाक होऊ लागली होती. राजकारणातील हा प्रस्थापित झालेला मनुवाद निमुटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नाही अशी धारणा झालेले अनेक आंबेडकरवादी नेते प्रस्थापित सत्ताधारी पक्ष कॉग्रेस किंवा भाजपच्या कश्छपी लागले आणि आपलं सत्तेतील एखाद पद मिळवू लागले.

मात्र गेली चाळीस वर्षे जाणिवपूर्वक आंबेडकरवादी राजकारणाला सर्वसमावेशकता आणण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी जात आणि धर्माच्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांना “डिकास्ट” होण्याचा आग्रह धरतात. स्वतः अनेक वेळा चालून आलेली सत्तेतील पदाच्या संधीचा त्याग केला आहे. स्वतः पद आणि सत्तेच्या परिघाच्या बाहेर राहिले मात्र लहान लहान जातीच्या अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्तीला मात्र सत्तेच्या खुर्चीत विराजमान केले.गेल्या चाळीस वर्षातील बदल बघा,१९९३-९४मध्ये निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा खामगाव येथे कार अपघात झाला होता त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांना तातडीने मुंबई येथे दवाखान्यात भरती केले होते,त्यांच्या पायात रॅड टाकून अॉपरेशन करण्यात आले होते त्यावेळी ती बातमी वा-या सारखी पसरली आणि बौद्ध कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली जिथं बाळासाहेब आंबेडकर भरती होते तिथं प्रचंड गर्दी जमु लागली त्यामुळे तिथल्या डॉक्टर आणि दवाखाना प्रशासनाला खूप त्रास झाला होता सांगण्याचे तात्पर्य असे की, तेव्हा बौद्ध कार्यकर्ता बाळासाहेब आंबेडकरांवरून जीव ओवाळून टाकायला तयार होता.

आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या तब्येतीची बातमी समजली आणि गुरुद्वारा, चर्च, दर्गा, महादेव मंदिर, भोलेनाथ मंदिर, बौद्ध विहारात बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रार्थना होऊ लागली आहे. दोन्ही घटनांची तुलना करता हेच लक्षात येते की, १९९३-९४ साली बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता हा बौद्ध होता तर २०२१ साली बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता हा सर्व धर्मीय कार्यकर्ता झाला आहे हेच सिद्ध होतं आहे. मनुवादी मिडिया गोपीनाथ मुंडे यांना वंजारी समुहाचा नेता, छगन भुजबळ यांना माळ्यांचा नेता म्हणून संबोधतो आणि तसाच सातत्याने प्रचार करीत असतो मात्र फडणवीस किंवा नितीन गडकरी,प्रकाश जावडेकर यांना त्याच मापाने मोजल्या जात नाही हेही लक्षात घ्यावे. अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने आणि कर्तृत्वाने ,तत्वाने मनुवादी मिडियाला सडेतोड ऊत्तर दिले आहे इथल्या, बौद्ध, हिंदू,मुस्लिम, लिंगायत, शिख, ख्रिस्ती सर्वच धर्मातील कार्यकर्त्यांनी आता बाळासाहेब आंबेडकरांना सर्वसामान्याचा नेता म्हणून मान्यता दिली आहे.

हेच गेल्या तीन दिवसातील महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांवरुन सिद्ध होतं आहे. याचा सरळ अर्थ असा की, आंबेडकरी राजकारणाचा परिघ विस्तारतं आहे, आंबेडकरवादी राजकारण आता बौद्ध समुहा पुरते मर्यादित राहिले नाही, अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने सर्वच बहूजन समाजाला आंबेडकरवादी राजकारण हेच आपणास सत्तेच्या दालनात घेऊन जाऊ शकते हा विश्वास दिला आहे. आज वंचित बहूजन आघाडीत बहूजन समुहाची संख्या कमी असेल परंतु ही परिवर्तनाची नांदी आहे. इथल्या घराणेशाही ला हटवून सर्वसामान्य नागरिकांना लोकशाहीचे हक्क आणि अधिकार आंबेडकरवादी राजकारणचं यशस्वीपणे देऊ शकते हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनो बाळासाहेब आंबेडकरांच्या धेय्य धोरणाला सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जा.

भास्कर भोजने.


       
Tags: Adv.Balasaheb Ambedkarambedkarmovementbabasahebambedkarbhaskarbhojane
Previous Post

मास्टरमाईंड

Next Post

बाळासाहेबांच्या सुदृढ प्रकृतीसाठी मुस्लिम समाजाकडून प्रार्थना

Next Post
बाळासाहेबांच्या सुदृढ प्रकृतीसाठी मुस्लिम समाजाकडून प्रार्थना

बाळासाहेबांच्या सुदृढ प्रकृतीसाठी मुस्लिम समाजाकडून प्रार्थना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु ‘या’ लीग्समध्ये खेळत राहणार
क्रीडा

धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु ‘या’ लीग्समध्ये खेळत राहणार

by mosami kewat
August 27, 2025
0

भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय...

Read moreDetails
नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश : कामगारांना दिलासा

नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश : कामगारांना दिलासा

August 27, 2025
वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन कळंब व उस्मानाबाद तालुका आढावा बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन कळंब व उस्मानाबाद तालुका आढावा बैठक संपन्न!

August 27, 2025
पंजाबमधील जवाहर नवोदय विद्यालयात पूर, ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी अडकले

पंजाबमधील जवाहर नवोदय विद्यालयात पूर, ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी अडकले

August 27, 2025
‘रमाबाई अपार्टमेंट’ इमारत दुर्घटना: विरारमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली

‘रमाबाई अपार्टमेंट’ इमारत दुर्घटना: विरारमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली

August 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home