सोलापूर – कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडॉउन काळामध्ये नाभिक समाजाचे मुख्य साधन केश कर्तन, सलून सेंटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्या कुटुंबाची उपासमार ही मोठ्या प्रमाणात होत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नाभिक समाजमधल्या 50 कुठुंबांना गहू, तांदूळ,दाळ, असे धान्य देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे,नगरसेवक गणेश पुजारी, नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष मोहन जमदाडे, बबन शिंदे, राम माने, अनिरुद्ध वाघमारे उपस्थित होते.
२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाशआंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत २३ मार्च रोजी नागपूर...
Read moreDetails





