Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 14, 2021
in विशेष
0
घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा
       

भारताचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मियांची परिषद आटोपून कोलंबोहून मुंबईत परत येत असता, १०जून १९५० रोजी त्यांचे त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेटीव्ह चेंबरमध्ये भाषण झाले. चेंबरच्या प्रशस्त हॉलमध्ये सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अस्पृश्यता बांधव यांची खूपच गर्दी होती. घटना व घटनात्मक नीती यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार प्रवर्तक व समयोचित असे भाषण केले. ते म्हणाले ,

प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हायची आले तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत व नीती पुढीलप्रमाणे आहे.

सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्यांकाच्या नियमाचे पालन.

त्याचप्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत-

देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे. असे दिसून आल्यास घटनात्मक नितीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे. अल्पसंख्याकांबद्दल आदर बाळगला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्य शासन निःपक्षपाताने चालविले पाहिजे.

आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की, घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटींवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटींवर लोकांनीं त्यांना वरील अधिकार दिले असतात. त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकारसूत्रे खाली ठेवली पाहिजेत. अल्पसंख्यांकांबद्दल  सरकारने आदर बाळगला पाहिजे. अल्पसंख्यांकाला आपली मत मांडण्याची योग्य संधी असावी. याच पायावर पार्लमेंटरी लोकशाहीची उभारणी झालेली आहे.

त्याचप्रमाणे निःपक्षपाती राज्यकारभार चालणे अवश्य आहे. ब्रिटिश  जनता कोणत्याही राजकीय पक्षाच्या लायकीचे मोजमापन त्याच्या गुणावरून करते. म्हणून एखादा पक्ष अधिकारावर आला तर त्याचे समाधान केले पाहिजे. त्याला खूश ठेवले पाहिजे, अशा वशिलेबाजीचा तेथे प्रश्नच उपस्थित होत नाही. भारतात मात्र अधिकारावर असलेला पक्ष काही लोकांना विशेष सवलती देतो. असे अनेक उदाहरणांवरून दिसून आले.

जुन्या घातुक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे. लोक या मार्गी लागतील अशी मला आशा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


       
Tags: ambedkarjayantibabasahebambedkarmuknayakprabuddhbharat
Previous Post

प्रबुद्ध समाजासाठी एक व्हा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post

सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या

Next Post
सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या

सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस
बातमी

धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

by mosami kewat
March 18, 2026
0

नवी दिल्ली / वॉशिंग्टन : भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या मूल्यांवरच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित...

Read moreDetails
दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

March 18, 2026
बँकांचे लाखो कोटी रुपये 'विल्फुल डिफॉल्टर्स'च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

बँकांचे लाखो कोटी रुपये ‘विल्फुल डिफॉल्टर्स’च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

March 18, 2026
अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

March 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home