Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गुलाब वादळाने महाराष्ट्राला झोडपले.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
September 30, 2021
in बातमी
0
चित्र प्रातिनिधिक

चित्र प्रातिनिधिक

       

गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा जोरदार फटका विदर्भ, मराठवाडा, उत्तर-महाराष्ट्रासह मुंबईला बसला आहे.  हिंगोली, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, लातूर, जालना, उस्मानाबाद  मध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावामधे पाणी शिरलं आहे. या अतिवृष्टीमुळे कापूस आणि आणि सोयाबीनच हाती आलेलं पीक हजारो शेतकऱ्यांनी गमावलं आहे. 

अतिवृष्टीमुळे जळगाव, नंदुरबार, नाशिक मधे नद्यांना पुर आले असुन नाशिक मध्ये गंगापूर धरणाचा विसर्ग सुरु करण्यात येणार आल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला होता .जळगाव मध्ये  बीड व लातूर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धनेगाव धरणातून मांजरा नदीत ७०००० क्युसेक पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले तसेच मध्ये मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडल्यामुळे ७८३९७ तर माजलगाव धरणाचे ११ उघडण्यात आल्यामुळे ८०५३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून मांजरा व सिंधफणा नदीच्या काठावरील गावांसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये यामुळे पूर सदृश्य निर्माण झाली असून शेतांमध्ये पुराचं पाणि शिरल्यामुळे शेतीच व विशेषतः सोयाबीनच मोठं नुकसान झालं आहे. बीड मधील केज, अंबेजोगाई, बीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरून परिस्थिती बिकट झाली आहे.

मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यामुळे उस्मानाबाद मध्ये अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. एनडीआरएफच्या बचाव पथकाने जवळपास ४९० लोकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नांदेडमधे पडला असुन विष्णुपुरी प्रकल्पाचे आठही दरवाजे उघडण्यात येऊन ८० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमधे पाणी शिरुन शेती व जनावारांचे मोठे नुकसान झाले. 

हिंगोलीत मागील  चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कयाधू नदीला पूर येऊन पुराचं अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांच्या बचावासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करावे लागले. एनडीआरएफच्या बचाव पथकाने बोट व हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 

राज्यात पावसाने आत्तापर्यंत ४३६ बळी घेतले  असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.व जवळपास २५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, मूग, कापूस, फळबागांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 


       
Tags: floodsgulab cycloneheavy rainsnashikvidarbha
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपयशी अमेरिका दौरा.

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका

Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
बातमी

२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

by mosami kewat
March 11, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाशआंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत २३ मार्च रोजी नागपूर...

Read moreDetails
ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

March 11, 2026
Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

March 11, 2026
इंस्टाग्राम डाऊन! फीड आणि मेसेजिंगमध्ये अडचणी; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

इंस्टाग्राम डाऊन! फीड आणि मेसेजिंगमध्ये अडचणी; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

March 11, 2026
पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

March 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home