औरंगाबाद: वंचित बहुजन महिला आघाडी औरंगाबाद शहराच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद औरंगाबाद शहरात न झाल्यामुळे या महिला सक्षमीकरण परिषद औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद संशोधन केंद्र टि व्ही सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट म्हणाल्या की, एक व्यक्ती एक मत हा अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला असल्यामुळे जाती भेद दूर होऊन सर्वाँना सामान वागणूक संविधान माध्यमातून मिळाला आहे. म्हणून महिलांनी समाजकारणात व राजकारणात पुढाकाराने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे.
महापुरुषांच्या विचाराचे व कृतीचे अनुकरण करून समाज उद्धार व्हायला पाहिजे. भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला. 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना अन्याय अत्याचाराच्या बंधनातून मुक्त केले होते त्याची जनजागृती म्हणून वंचित बहुजन आघाडी मार्फत जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतो असेही त्यांनी सांगितले.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वंदना नरवडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, दामिनी पथक सहाय्यक फौजदार लता जाधव,हेड कॉन्स्टेबल सुजाता खरात, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील ताराबाई शिंदे अध्ययन केंद्राच्या प्रा. आश्र्विनी मोरे, विद्वत्त सभेच्या प्रा. प्रज्ञा साळवे आदी प्रमुख यावेळी उपस्थिती होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिषदेला सुरवात करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सचिव तय्यब जफर, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, महिला अध्यक्षा लता बामणे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, आदींच्या प्रमुख उपस्थितीतमहिला सक्षमीकरण परिषद संपन्न झाली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप. शहर अध्यक्षा वंदना जाधव यांनी केला. प्रास्ताविक प्रा.संगीता अंभोरे यांनी केले. सूत्र संचालन सह सचिव शितल बनकर आणि ज्वाला रगडे यांनी केले. तर मनोगत आशा बरसवने व वैशाली राणेकर यांनी व्यक्त केले.
आभार प्रदर्शन शहर महासचिव साधना पठारे यांनी केले. महिला आघाडी जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, सुलोचना साबळे, सुजाता गायकवाड, सुनीता सोनावणे, जया गजभिये, पुष्पा घोडके, श्रुती शिरसाठ, अर्चना साबळे, नर्मदा देंडगे, मृणाल शिंदे, अर्चना बामने,जयश्री नवगिरे,वर्षा खरात,पंचशीला सोनावणे, शोभा भालेराव, मंगल दाभाडे, वंदना वाठोरे, कविता भुजंगे,मनीषा मिसाळ, आदींसह मोठ्या संख्येने शहरातील महिलांची उपस्थिती होती.