अकाेल्यातील शेतक-यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सुजात आंबेडकर यांनी नमूद केले.
अकोला – शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन ती खते चढ्या भावाने विकल्या जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी ह्या शेतकऱ्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीकडे केल्या हाेत्या. या तक्रारींनुसार प्रशासनाने शेतक-यांना खतांची उपलब्धतता करुन द्यावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी गाेदामाचा ताबा घेईल, असा इशारा कृषी विभागास दिला.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते यांनी अकोला जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांची भेट घेतली. “अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन व प्रशासनाला अजुन जाग आली नाही का…? की फक्त खोटी आश्वासने ह्या त्रिकुट सरकार देत आहे असा सवाल विचारला.
शेतकऱ्यांच्या नुकसान संदर्भात माहिती दिली असतांनाच त्यात शेतीसाठी आवश्यक असलेल्या खंताची मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये माल साठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. या टंचाईचा फायदा घेत अनेक कृषी सेवा केंद्रवाल्यांनी खतांची चढ्या भावाने विक्री करुन हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकल्यासारखा प्रकार करत आहे. हा प्रकार आपण आपल्या स्तरावरून आदेशित करुन तात्काळ थांबवावा व साठवणुक केलेल्या खताला शेतकऱ्यांना शासकीय किमतीत उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी हे गोडाऊनवर ताबा करून शेतकऱ्यांना स्वतः खते वाटप करेल असा अल्टिमेटम जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.