देशात सध्या आगामी पाच विधानसभा राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोराम येथे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आगामी या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने पुन्हा माती खात सहकारी पक्षांना दगाफटका दिला आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षासोबत जागा वाटप करण्यास कॉंग्रेस पक्षाने नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेले अखिलेश यादव प्रचंड चिडले आहेत आणि कॉंग्रेस पक्षाला त्यांनी सुनावले आहे. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आसल्याची बतावणी कॉंग्रेस पक्षाकडून केली गेली. मात्र, ज्या ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सक्षम आहेत, त्यांच्यासोबत कॉंग्रेसने सामावून न घेता आडमुठी भूमिका घेऊन त्या-त्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
अशामध्ये अखिलेश यादवने थेट कॉग्रेस पक्षावर आरोप करत ते भाजपासोबत मिळाले असल्याचा गंभीर आरोप केलाय. यावरून कॉंग्रेस पक्षाचे चरित्र उघडे पडले आहे. इंडिया आघाडीतील कॉंग्रेस पक्ष हा सर्वांत मोठा व सर्वांत जुना पक्ष आहे. भाजपासारख्या फॅसिस्ट पक्षाला हरवण्यासाठीची दानत कॉंग्रेसमध्ये दिसत नाहीये. महाराष्ट्रात या पेक्षा वेगळे चित्र नाहीये. भाजपाविरोधात सक्षमपणे लढू शकणाऱ्या सेक्युलर फोर्सेसला कॉंग्रेस तुच्छतेची वागणूक देते. आगामी विधानसभा निवडणुकांचे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवीन परिवर्तन आणि दिशा ठरवतील.
वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष ज्याने 2019च्या निवडणूकीत महाराष्ट्रात 7 टक्के मतदान घेतले होते. त्याला कॉंग्रेस पक्ष इंडिया आघाडीत सामावून घ्यायला इच्छूक नाहीये. यावरून त्यांचे चरित्र समजते. कॉंग्रसच्या मूर्खपणामुळे इंडिया आघाडी धोक्यात आली आहे. आणि अशात महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते वंचित बहुजन आघाडीवर टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न करताय. ज्यांना आपलं स्वताचं घर सांभाळता येत नाही, ते वंचित बहुजन आघाडीवर टीका करायला निघाले आहेत. अशात कॉंग्रेसने समजूतीने वागून इतर सर्व सहकारी पक्षांना समानतेची वागणूक दिली पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात शिवसेनेशी (उद्धव ठाकरे) युती आहे. वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीचा भाग होण्यासाठी पुढाकार घेतला होता. कॉग्रेस पक्षाचे राष्टीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र पाठवून इंडिया आघाडीत येण्याची इच्छा दाखवली. तरीसुद्धा कॉंग्रेसने त्यावर सजगता दाखवली नाही.
मध्य प्रदेशातील जागा वाटपावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या मतभेद उघड होणे, देशाच्या राजकारणासाठी अनुकूल नाहीये. “काँग्रेसने आपल्या मित्र पक्षांना सामावून घेतले नाही, तर विरोधी आघाडी एकत्र कशी चालेल? कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी नाही. जर ही भूमिका मांडली असेल, तर त्यांनी इंडिया आघाडी बनवण्यापूर्वी ते स्पष्ट करायला हवे.” ते न होता मित्र पक्षांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.
कॉंग्रेसचे चरित्र नेहमीच त्यांच्या आघाडीतील भागीदारांना वापरून फेकून देण्याचे राहीलेले आहे. सध्या ते स्वतःच्या राजकीय हितासाठी इंडिया आघाडीचा वापर करत आहेत. तुम्हाला वाटेल तेव्हा मित्र पक्षांचा तुम्हाला अनुकूल वापर करून घ्या आणि गरज नसेल तेव्हा टाकून द्या. असा सरंजामी कॉंग्रेसी दृष्टीकोन चालणार नाही. मुद्दा सत्ता किंवा जागा वाटपाचा नसावा तर “भाजप/आरएसएसचा मुकाबला करू शकणारा मजबूत विरोधी पक्ष उभा करणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्याऐवजी काय होत आहे की, विरोधी पक्ष एकमेकांशी भांडत आहेत, त्यांचे मतभेद उघड करत आहेत,” अशात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राभर जनाधार वाढत आहे. नुकत्याच अकोला, धुळे, सटाणा येथील सभांना उसळलेला जनसागर त्यांची राज्यात असलेल्या जनशक्तीची ताकद अधोरेखित होतीय.