पुणे : वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा सीमा भालेसन यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली. वंचित बहुजन महिला आघाडीच्या माजी महासचिव वृषाली वीरगुजर यांची पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. व त्यांना विशेषतः भोर आणि वेल्हे या तालुक्यात संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी वडगाव मावळ तालुका अध्यक्ष नितीन भाऊ, महाराष्ट्र राज्य सचिव अनिता सावळे, राज्य सदस्या निर्मला वंनशिव, जिल्हा संघटक रंजना रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन जबाबदारीनिमित्त पुणे जिल्हा अध्यक्षा सीमा भालेसईन व महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी वृषाली वीरगुजर यांचे अभिनंदन केले. तसेच, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी त्या मनापासून प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.