भिवंडी : भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांच्या हस्ते करण्यात आले. शहराचे नवनियुक्त अध्यक्ष मनीष देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय उत्तम नियोजन करत जनसामान्यांसाठी आपल्या हक्काचा एक ठिकाण म्हणून या कार्यालयाची निर्मिती केली आहे.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी, समता सैनिक दल व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांमध्ये दिसणारा उत्साह व ऊर्जा नक्कीच पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला भिवंडी शहरामध्ये राजकीय वर्चस्व मिळवून देईल याचा विश्वास वाटतो!





