]]>
मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन
https://eprabuddhbharat.com/malayalam-tv-actor-siddharth-venugopal-passes-away-at-41-after-cancer-battle/
Sat, 18 Apr 2026 11:13:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17216Entertainment News : मल्याळम टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे वयाच्या ४१व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडी येथील सिद्धार्थ वेणुगोपाल यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण […]
]]>ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!
https://eprabuddhbharat.com/legendary-singer-asha-bhosle-passes-away-at-92-in-mumbai/
Sun, 12 Apr 2026 08:00:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17080पुणे : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज मुंबई येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांचा पुत्र आनंद भोसले यांनी ही माहिती दिली. आशा भोसले यांचे पार्थिव उद्या सकाळी ११ […]
]]>धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/religious-freedom-bill-a-threat-to-democracy-says-anjali-ambedkar-at-konkan-literary-conference/
Mon, 30 Mar 2026 14:24:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16703खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात विविध साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील सध्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडींवर भाष्य केले. प्रा. […]
]]>मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार
https://eprabuddhbharat.com/madhya-pradesh-shocker-kbc-winner-and-tehsildar-amrita-singh-tomar-arrested-for-2-5-crore-fraud-via-127-fake-accounts/
Fri, 27 Mar 2026 13:52:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16627मध्य प्रदेश: मध्यप्रदेशात एका धक्कादायक प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला तहसीलदार अमृता सिंह तोमर यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. 2021 साली बडोदा तहसील परिसरात झालेल्या सुमारे अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ग्वालियरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून […]
]]>आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-attacks-rss-calls-its-cultural-politics-dangerous-for-india/
Mon, 09 Feb 2026 11:00:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15350मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सध्या आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असून, ज्या गोष्टींना पूर्वी तुच्छ मानले जात होते, त्यांनाच आता ‘कॅश इन’ करण्याचे काम संघ करत आहे. आरएसएसचे चरित्र आता ‘डी-बेस’ आणि ‘डी-डिफाइन’ असे झाले आहे, अशी सडकून टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी […]
]]>बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’चा अस्त: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप
https://eprabuddhbharat.com/bollywood-he-man-dharmendra-passes-away-legendary-actor-cremated-in-mumbai/
Mon, 24 Nov 2025 12:40:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12330मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सोनेरी अध्याय आज समाप्त झाला. आपल्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. गेले अनेक दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर, आज त्यांची प्राणज्योत मालवली. […]
]]>दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
https://eprabuddhbharat.com/veteran-actor-satish-shah-passes-away-at-74-bollywood-mourns-the-loss/
Sat, 25 Oct 2025 11:43:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11429मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांति ओम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चरित्र आणि विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. […]
]]>बॉलिवूडचे ‘शोले’तील ‘जेलर’ असरानी काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
https://eprabuddhbharat.com/mumbai-bollywood-veteran-asrani-passes-away-at-84/
Mon, 20 Oct 2025 16:16:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11326मुंबई : आपल्या मिश्किल आणि अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज (२० ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.’शोले’ चित्रपटातील “हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं!” हा अजरामर संवाद आणि त्यांची खास शैली आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या […]
]]>ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’च्या कर्णाची 68 व्या वर्षी अखेर
https://eprabuddhbharat.com/mumbai-veteran-actor-pankaj-dhir-passes-away-karna-of-mahabharata-dies-at-68/
Wed, 15 Oct 2025 11:59:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11220मुंबई : ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. ‘महाभारत’ मालिकेत ‘कर्ण’ची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्याने 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच काळापासून पंकज धीर हे कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक चाहते आणि कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे […]