पुणे : फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. एम. बी. वाघमारे यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेली तब्बल सहा दशके त्यांनी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवत विविध स्तरांवर कार्य केले.
ॲड. वाघमारे हे चळवळीतील अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांशी निगडीत होते. त्यांनी भारिपच्या पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. चळवळीतील प्रत्येक घटकाला मदत, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे ही त्यांची खास ओळख होती. (Adv. M. B. Waghmare Passes Away)
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समर्पण, सातत्य आणि कार्यकर्त्यांप्रती जिव्हाळा यांचे अनोखे मिश्रण होते. अनेक पिढ्यांना त्यांनी प्रेरणा दिली आणि चळवळीच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला.
त्यांचे चिरंजीव प्रशांत वाघमारे हे नुकतेच पुणे महानगरपालिकेतील शहर अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. (Adv. M. B. Waghmare Passes Away)
ॲड. एम. बी. वाघमारे यांचे अंत्यसंस्कार आज, २६ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता औंध स्मशानभूमी, औंध येथे पार पडणार आहेत. त्यांच्या निधनामुळे फुले-आंबेडकरी चळवळीने एक निष्ठावान, लढवय्या आणि मार्गदर्शक नेता गमावला आहे.






