माढा : वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभाग सोलापुरच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक टेंभुर्णी (ता. माढा जि. सोलापुर) येथे पार पडली. आगामी काळात माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा सोलापुर जिल्हा समन्वयक डॉ. नितीनजी ढेपे व वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापुर जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याच्या अनुषंगाने माढा लोकसभा विभागातील पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. सदर बैठकीत समविचारी पक्षाशी युती करुन निवडणुक लढण्याचे व युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडी माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला तालुक्यात स्वबळावर मोठ्या ताकदीने निवडणुक लढण्याचे आदेश डॉ नितीनजी ढेपे यांनी दिले. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात घोंगडी बैठका आयोजित करुन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना करण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटनिहाय पदाधिकारी कार्यकारण्या तसेच नगरपालिका व नगरपरिषदांच्या वॉर्ड कार्यकारण्या जाहीर करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
यावेळी माढा लोकसभा विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, सोलापुर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महासचिव विशाल नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहळ, एम, बी कांबळे, लालासो मुलाणी, नौशाद शिकलकर, सुदेशना बडेकर, सत्यवान हांडे, जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, बाबा ओहळ, विलास कांबळे, अभिमान जगताप, राज वाघमारे,औदुंबर लेंगरे पाटील, रविंद्र कांबळे, विनोद ऊबाळे, स्वप्नील सावंत, प्रा. नवनाथ साळवे, सुरेश मोठे तसेच माढा लोकसभा विभागातील आजी, माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.