भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांनी यूपीच्या दौऱ्यावर केलेलं वक्तव्यावर नुसार त्यांच्या पाच लाख पगारात साडेतीन लाखाची कपात होत असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी कानपुर स्टेशनवर पोहोचले तेव्हा त्यांनी जनतेला संबोधीत करताना त्यांना मिळणाऱ्या पगाराचा पाढा वाचला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वक्तव्य केलं की राष्ट्रपतींची गणना हि देशातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या लोकांच्या यादित केली जाते. परंतू जर मी जास्त पगार घेतो तर त्याच्या हिशोबानेच मला टॅक्स देखिल भरावा लागतो. राष्ट्रपतींच्या या भाषणा मुळे राष्ट्रपतींच्या पगाराचे कवित्व सुरू झाले आहे.
देशात सर्वाधिक वेतन हे राष्ट्रपतीला मिळते.”आम्हाला ५ लाख रुपये वेतन मिळतं. पण त्यापैकी पावणे तीन लाख रुपये हे टॅक्स कापला जातो. मग सांगा उरले किती रुपये? जितके उरले त्याहून कितीतरी अधिक वेतन अधिकारी आणि इतरांना मिळते. इथे शिक्षकही आहेत. त्यांना तर सर्वाधिक वेतन मिळते”, असं राष्ट्रपती कोविंद म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांना दर महिन्याला ५ लाख रुपये पगार दिला जातो.ह्याआधीचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांना १.५ लाख रुपये प्रति महिना पगार दिला जायचा. पण हा पगार इतर पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी होता.
सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर कॅबिनेट सचिवचा पगार २.५ लाख प्रति महिना आणि केंद्र सरकार सचिवचा पगार २.२५ लाख प्रति महिना झाला. पण राष्ट्रपतीचा पगार मात्र १.५ एवढाच राहिला.ह्यानुसार केंन्द्रीय कर्मचाऱ्याचे वेतन हे राष्ट्रपतीच्या वेतनापेक्षा १ लाखाने अधिक झाले होते. राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेकरिता हे चुकीचे होते. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार राष्ट्रपतीपेक्षा अधिक असणे हे चुकीचे होते.ह्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्राच्या सर्वोच्च व्यक्तीच्या पगारात ७ व्या वेतन आयोगानुसार २०० पटीने वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे राष्ट्रपतीचा पगार हा १.५ लाखावरून ५ लाख प्रति महिना एवढा झाला. तर उपराष्ट्रपतीच्या पगारात देखील वाढ करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतीचा आधीचा पगार १.२५ लाख प्रति महिना एवढा होता तो आता ३.५ लाख प्रति महिना करण्यात आला आहे.
पगार कपातीची वस्तुस्थिती काय आहे ?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पगारातून दरमाह ३० टक्के रक्कम वजा केली जात आहे.मात्र ही रक्कम कर म्हणून कपात केली जात नसून राष्ट्रपती हि रक्कम स्वत:च्या इच्छेने दान करत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना संकट काळात त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. त्यांच्या पगारातील ३० टक्के रक्कम दान करणार असल्याची गेल्या वर्षी मे माहिती त्यांनी राष्ट्रपती भवन च्या वतीने दिली होती. त्यामुळेच गेल्या वर्षी पासून राष्ट्रपतींना ३० टक्के वेतन कपात करुन मिळत आहे.उत्तर प्रदेश दौऱ्यात त्यांनी ती रक्कम कर म्हणून कपात करत असल्याचे सांगितले आहे !
सहाजिकच त्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. बोलण्याच्या ओघात राष्ट्रपती ३०% कपात ही टॅक्स कपात नसल्याचे ते विसरले की राष्ट्रपती भवनने अजून त्यांना कपातीचे रहस्य सांगितले नाही.हे गुलदस्त्यात आहे.
पुढच्या भाषणात कदाचित ते वस्तुस्थिती स्पष्ट करतील.तो पर्यंत होऊ द्या जोरात चर्चा.
राजेंद्र पातोडे
वंचित बहुजन युवक आघाडी