डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनियर असोशियन व बौद्ध विकास महासंघ पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विहारांमध्ये पुस्तक आणि ग्रंथ भेट देण्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इंजीनियर असोसिएशनच्या माध्यमातून बुद्ध विहार तेथे ग्रंथालय अशा उपक्रमातून या कार्यक्रमाचे अभियान राबविण्यात येत आहे या विहारांमध्ये स्पर्धा परीक्षा धार्मिक सामाजिक व मान्यवर आदर्शांची पुस्तके भेट देऊन विहारातील सर्व सदस्यांकरिता याचा वापर करता येईल व आपल्याला आपला इतिहास सामाजिक आर्थिक बाबींचा अभ्यास करता येईल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चिखली ताम्हाणे वस्ती येथील सिद्धार्थ विहार या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील एकूण सात विहारांना पुस्तके देऊन या अभियानाची सुरुवात केली. यावेळी वानखडे साहेबांनी पुस्तके वाचल्याने अभ्यास असल्याने आपणास कसा उपयोग होऊ शकतो याबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते तसेच बानाई च्या वतीने सर्व अभियंता वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कांबळे तसेच कार्यक्रमाचे नियोजन अंकुर सेवा संघ सिद्धार्थ बुद्ध विहार यांच्यावतीने करण्यात आले.