अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तमाम वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियाबाबत व सुदृढ प्रकृती बाबत अनेक धार्मिक स्थळावर प्रार्थना कबुली केली.
अकोल्यातील जुने शहरातील अनेक दशकापासून नावाजलेली शाह जुलफिकार बाबाच्या दर्ग्यावर अकोला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष कलीम पठाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम मंडळातील कार्यकर्त्यांनी चादर चढवली.
यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांना सुदृढ प्रकृती आणि यशस्वी बायपास शस्त्रक्रियेबाबत त्यांनी मागितलेल्या कबुलीवर चादर चढवून कामना केली.
याप्रसंगी अकोला जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष कलिंग खान पठाण, अमन खाडे, एस के साबिर, सय्यद अलिमुद्दिन, अन्वर शेरा, जुनेद मंजर, सरदार खान, सबीर मुलाना, बाबा भाई उपस्थित होते.