छत्तीसगड, सुकमा – छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील गोलापल्ली येथे नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून सुरक्षा दलांना लक्ष्य केले. यामध्ये एका वरिष्ट पोलिश अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर अनक जवान जखमी झाले. सुकमा जिल्हा्यातील गोलापल्ली येथे नक्षलवाद्यांनी एक पोकलेन पेटवून दिले. याची माहिती मिळताच सुकमा येथून पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले, ज्यामध्ये एएसपी, एसडीओपी आणि पोलिस स्टेशन इन्चार्ज यांचा समावेश होता. येथे नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात एएसपी शहीद झाले, तर एसडीओपी आणि पोलिस स्टेशन इन्चार्ज गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले.
या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, २१ मे रोजी बसवराजूसह २८ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार मारले होते. त्यानंतर संतप्त नक्षलवाद्यांनी १० जून रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्यानंतर नक्षलवाद्यांनी गोल्लापल्लीजवळील खाणीत वापरल्या जाणाऱ्या पोकेलेनला आग लावली. या घटनेची माहिती मिळताच, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव एसडीओपी आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले. नक्षलवाद्यांना माहिती होती की वरिष्ठ अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांसह नक्कीच येतील.याचा अंदाज घेऊन नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता. एएसपी तिथे पोहोचताच ते आयईडीखाली आले. या घटनेत आकाश राव गंभीर जखमी झाले. पोलिस स्टेशनचे प्रभारी व्यतिरिक्त एसडीओपी देखील जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी कोंटा येथील रुग्णालयात आणण्यात आले. घटनेनंतर परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.
आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले की, सुकमा जिल्ह्यातील कोंटा विभागाचे एएसपी आकाश राव गिरिपांजे हे कोंटा-एराबोरा रस्त्यावरील दोंड्राजवळ झालेल्या प्रेशर आयईडी स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात काही इतर अधिकारी आणि सैनिकही जखमी झाले आहेत.