Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न

Nitin Sakya by Nitin Sakya
May 9, 2021
in बातमी, राजकीय
0
कोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न
       

करोनाच्या दुस-या लाटेशी संपुर्ण देश झुंजत आहे. करोना बाधितांचा रोजचा आकडा ४ लाखाच्या पार गेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणा-या संशोधकांनी हा आकडा मेच्या मध्यापर्यंत ५ लाख अणि जुन महीन्यात ३० लाखपर्यंत जाऊ शकतो असा ईशारा दिलेला आहे जो फारच चिंताजनक आहे. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईजवळ नालासोपारातील विनायक व रिद्धी विनायक हॉस्पीटल आणि दिल्लीतल्या बात्रा हॉस्पिटल व जयपुर गोल्डन ज्युबली हॉस्पिटाल ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा जीव गेला आहे. चेन्नई मधे ऑक्सिजनवर संशोधन करणारे मुळचे महाराष्ट्राचे रहीवासी असलेले डॉ.भालचंद्र काकडे ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडले आहेत. या संकटाच अस्तित्व मान्य करुन या संकटाचा मुकाबला करण्याऐवजी केंद्र सरकार जाब विचारणा-या ट्विट्स डिलीट करत आहे तर युपी सतकारने सोशल मिडीयात ऑक्सिजन व बेडसाठी मदत मागणा-या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यावरुन दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातला वाद सर्चोच्च न्यायालयात गेला आहे.

ऑक्सिजन व आवश्यक औषधांच्या उपलब्धेतबाबत ग्रामिण महाराष्ट्र अजुनही संघर्ष करत आहे. पण नंदुरबार या आदीवासी बहुल जिल्ह्याने मात्र केवळ महाराष्ट्राच नाही तर सगळ्या भारताच लक्ष वेधुन घेणारी कामगिरी केली आहे. सगळा देश ऑक्सिजनच्या तुटवड्याशी झगडत असताना नंदुरबार मधे मात्र ऑक्सिजन आणि बेडची कोणतीही कमतरता नाही. ऊलट शेकडो ऑक्सिजन बेड आज रिकामे असुन शेजारील जिल्हेच नव्हे तर गुजरात आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यातुन सुद्धा करोनावर उपचारासाठी नंदुरबारला येत आहेत आणि हे सगळ साध्य झालं आहे ते नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या दुरदृष्टीमुळे.

मे-जुन मधे ज्यावेळेस देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत होता तेव्हा नंदुरबारने २० बेडपासुन सुरवात केली. पण आज नंदुरबार मधे जवळपास १२०० ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड असुन जवळपास ७ हजार अयसोलेशन बेड आहेत. सप्टेंबर २०२० मधे देशात करोनाची लाट ओसरत होती. सरकारने अनेक निर्बंध हटवायला सुरवात केली होती. जनजीवन सामान्य होत होते. केंद्र सरकार व्हॅक्सिन डिप्लोमसीच्या माध्यमातुन ईतर देशाचे मनं जिंकण्याचा प्रयत्न करत होते. रेमिडीसीवीर, ऑक्सिजनच्या निर्तीयाला परवानगी देण्यात अली होती. जणू करोनावर मात केली असेच सर्वसामान्य लोकांना आणि सरकारला वाटतं होते. करोनाची दुसरी लाट येणार अशी कुजबुज कानावर येत होती. करोनाच्या दुस-या लाटेत ब्राझीलच्या वाताहतीच्या बातम्या मिडीयात येत होत्या पण केद्र व राज्य सरकार त्याबाबत पुर्णपणे ऊदासीन असल्याचे चित्र होते. ही उदासीनता प्रशासकिय पातळीवर अनेक ठिकाणी दिसत होती. राज्यात अनेक ठिकाणचे कोविड सेंटर रुग्णांच्या अभवी बंद करण्यात आले. नेमकं याच काळात नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड अधिक जोमाने कामाला लागले. वादळाचा मुकाबला करण्याची खरी तयारी वातावरण शांत असताना करायची असते हे डॉ. राजेंंद्र भारुड यांना पक्क ठाऊक होत.

ब्राझील आणि अमेरिकेत आलेली करोनाची दुसरी लाट लवकरच भारतात येणार हे ओळखुन डॉ. राजेंद्र भारुड यांनी त्यादृष्टीने जिल्ह्याची वैदयकीय यंत्रणा सुसज्ज करायला सुरवात केली नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांनी नैसर्गिक आपत्ती निवारण नीधीतुन ८५ लाख खर्च करुन पहीला ऑक्सिजन प्लांट बांधुन घेतला. त्यानंतर त्यांनी त्याच हॉस्पिटल मधे आणखी एक व दुसरा प्लांट शहादा शहरात बसवला. त्या नंतर मार्च मधे त्यांनी आणखी एक ऑक्सिजन प्लांट बसवला. यामुळे नंदुरबार ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. याशिवाय त्यांनी माझगाव डॉक कडून ३० रुग्णवाहीका मिळवल्या. यामुळे रुग्णांची वाहतुक सुरळीत झाली. बेडसाठी रुग्णांची धावपळ होऊ नये म्हणुन कंट्रोल रुम निर्माण केला जिथून लोकांना बेड, औषधे, एम्बुलंस या विषयी माहीती पुरव‍ली. जिल्हा रुग्णालयात सर्व आवश्यक औषधांचा पुरेसा साठा करुन ठेवला. ही सगळी माहीती वेबसाईटच्या माध्यमातुन जनतेला उपलब्ध करुन दिली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी आणखी महत्वपुर्ण काम केल. जिल्हयातील बहुसंख्य जनता ही गरिब आदीवासी असल्यामुळे अनेक जण कोविड टेस्टींग बाबत ऊदासीन असत. त्यामुळे त्यांनी ज्या गावात एखादा कोविड पेशंट सापडेल त्या गावात आरोग्यपथक पाठऊन पेशंटचे नातेवाईक, शेजारी आणि मित्रमंडळींचे स्वाब घेणे सुरु केले. पॉजीटीव्ह पण कोणतही लक्षण नसलेल्या पेशंटला तात्काळ आयसोलेशन मधे पाठवले. यातुन जिल्ह्यात करोनाचा प्रसार कमी झाला. शिवाय त्यांनी गावागावात व्हॅक्सीनेशन कॅम्प सुरु करुन जनतेची गैरसोय टाळली.

नंदुरबारचे कलेक्टर डॉ.राजेंद्र भारुड यांना जमलं ते राज्यातील जिल्हाधिका-यांना का नाही जमलं हा महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न नेतृत्व आणि जबाबदारीशी संबंधित आहे. डॉ. राजेंद्र भारुड हे स्वत: नंदुरबार मधले असुन ते भिल्ल या आदीवासाी जमातीचे आहेत. त्यामुळे त्यांना ईथल्या समस्या नेमकेपणाने माहीत आहेत. शिवाय ते स्वत: एमबीबीएस डॉक्टर असल्यामुळे संसर्ग कश्याप्रकारे काम करतो याची त्यांना चांगली जाण आहे. त्यांनी दुरदृष्टीने भविष्यातील दुस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन निर्णय घेतले आणि ते निर्णय तातडीने अंमलात आणले.

आज मुंबई, पुणे, नाशिक मधे रुग्णसंख्या घटत असली तरी विदर्भ, मराठवाड्याचे काही जिल्हे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. हीच दुरदृष्टी या जिल्ह्यातील अधिका-यांनी दाखवली असती तर अनेक जीव वाचले असते. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचे संपुर्ण लक्ष मुंबईवर आहे कारण मुंबई महानगर पालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण राज्याच्या ईतर जिल्हयात आजही व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजन मिळणे अवघड झाले आहे. सप्टेंबर महीन्यात स्वत: मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे करोनाच्या दुस-या लाटेचा ईशारा देत होते मात्र मुंबई वगळता ईतरत्र या दुस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी तयारी करण्यात मात्र ऊद्धव ठाकरे अपयशी ठरले. मुख्यमंत्र्यांच्या याच निष्क्रीयतेमुळे दुस-या लाटेच्या सुरवातीला महाराष्ट्रात शेकडो जणांचे जीव गेले. यातील अनेक जीव वाचवणं शक्य होत.

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या दुरदृष्टी असलेल्या जिल्हाधिका-यामुळे नंदुरबारमधे शक्य झाले. हीच दुरदृष्टी मविआ सरकारने दाखवली असती तर आज महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांचे जीव वाचवता आले असते. भविष्यात जेव्हा जेव्हा भविष्यात कोविड संसर्गाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कामगिरीची दखल निश्चितच घेतली जाईल.


       
Tags: cmcoronacovidMaharashtranandurbarrajendra bhaud
Previous Post

पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !

Next Post

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस

Next Post
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"
बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

by Tanvi Gurav
July 17, 2025
0

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025
सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home