लंडन –
आयसीसीने हॅाल ऑफ फेमची 115 खेळाडूंची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये नवीन 7 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आला आहे. आजवर आयसीसीने एकूण 11 भारतीय खेळाडूंना हॅाल ऑफ फेमने सन्मानित केले आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी हा 11 वा भारतीय खेळाडू असून पुरुषांमध्ये तो नववा खेळाडू आहे.
लंडनमध्ये झालेल्या एका समारंभात आयसीसीने हॉल ऑफ फेम म्हणून धोनीचा गौरव केला. आयसीसीने 115 खेळाडूंच्या यादीत 7 नवीन खेळाडूंचा समावेशी केला यामध्ये 5 पुरुष आणि 2 महिला खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनीचा समावेश झाल्ल्याने आयसीसीने हॉल ऑफ फेमने सन्मानित केलेला तो 11 वा भारतीय खेळाडू ठरला असून पुरुषांमध्ये नववा खेळाडू आहे. महेंद्रसिंग धोनीने सन 2004 मध्ये भारतीय एकदिवशीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर धोनीने सन 2007 मध्ये झालेल्या पहिल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने हा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर त्याने सन 2011 मध्ये भारताला वन-डेचा विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच सन 2013 मध्ये देखील त्याने भारतीयांना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव कर्णधार ठरला होता.
भारताच्या महेंद्रसिंग धोनीसह, दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट सलामीवीर हाशिम अमला,ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फलंदाज मॅथ्यू हेडन, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ, न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू डॅनियल व्हिटोरी यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे, आयसीसीने जागतीक क्रिकटमधील या 5 दिग्गज मोठ्या क्रिकेटपटूंना त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीतील योगदानासाठी हाॅल ऑफ फेमचा हा मोठा सन्मान दिला आहे.