सरकारने अनेक घटकांना मदत केली तर काहींना मदतीची हमी दिली, मात्र या सर्वापासून तमाशा कलाकार वंचितच राहिले, अशी खंत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे यांनी एका मुलाखतीत आपली वेदना मांडली. गेल्यावर्षीपासून तमाशा कलावंत आपली व्यथा मांडत आहे, त्यांनी त्यासंदर्भात आंदोलन ही केलय मात्र त्यावेळेस त्यांना मदतीची हमी देण्यात आलेली होती मात्र अजूनही काही मदत त्यांच्या पर्यंत पोहचली नाही. त्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.
समाजातील दुर्लक्षित घटकांना वंचित बहूजन आघाडी नेहमीच मदतीचा हात देत असते, ह्यावर्षी कोरोनाची दुसरी लाट वाढत चालली आहे त्यानिमित्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा होणारा खर्च समाजातील घटकांना मदत म्हणून वापरा असे आवाहन केले होते त्याच आवाहनाला प्रतिसाद देतांना महाराष्ट्राच्या या लोककलावंतांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतुल बहुले व साडेसांगवी गावचे मा. सरपंच आप्पा कसबे यांनी आर्थिक करून बाळासाहेबांच्या आवाहनाला उत्स्फूर्त साथ दिलीय.