कुर्ला – वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुकाच्यावतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मोफत कोचिंग क्लासेस आम्रपाली बुध्दविहार येथे मागील एक महिन्यापासून 55 मुलांना वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका आणि आम्रपाली बुध्द विहारातर्फे मोफत शिक्षण देत आहेत.
एक महिना पुर्ण झालं याचं औचित्य साधुन मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये मुलांनी डान्स, नाटक, भाषण, सामाजिक प्रबोधन केले. यावेळी तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर तसेच सुधाकर काबंळे यांनी विद्यार्थी तसेच पालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुमच्यासोबत आहे.
यावेळी महिला तालुका अध्यक्ष संध्या पगारे, सुरेखा खरात, मालती वाघ, किरण कांबळे, शशिकांत मोरे, सचिन जाधव, रोहण वाघमारे, सचिव संदिप पवार, किरण कांबळे शिक्षण समिती प्रमुख, राजेश साळवे, शैलेश सोनवने, अनिल म्हस्के, पंकज भारतीय, अरविंद पवार, जगदिश झनके, अफजल शेख, अंबवडे काका, शिरीष जाधव, विकी चवरे, अनिल मस्के, रविंद्र इंगळे, अजय सपकाळे, अमन बोदडे, अनिकेत इंगळे, मनोज इंगळे, सिद्धांत बोदडे, किरण झालटे, अक्षय नरवाडे,अक्षय गुरचड, रोहित बोदडे, अमोल सुरवाडे, सुमित बोदडे, सुमित सुरवाडे, मयूर बोदडे उपस्थित होते. अक्षय पवार, विक्रांत उनावने, रोहण गायकवाड उपस्थित होते. यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.