Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

mosami kewat by mosami kewat
April 9, 2026
in बातमी, सामाजिक
0
पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

अकोला : पातूर तालुक्यात ग्राम पिंपळडोळी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित विविध शिबिरांचा समारोप सोहळा आणि एकदिवसीय भव्य धम्म परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.

पातूर तालुक्याच्या वतीने दहा दिवसीय श्रामनेर बौद्धाचार्य शिबिर, तसेच तालुक्यातील विविध दहा गावांमध्ये महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरे आणि समता सैनिक दल शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

Also Read : ‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

या सर्व शिबिरांचा समारोपीय कार्यक्रम ग्राम पिंपळडोळी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भदंत राज ज्योतीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. धम्म परिषदेचे उद्घाटन भिमराव तायडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास पातूर तालुक्याचे अध्यक्ष राजेश सरकटे, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे, प्रमुख मार्गदर्शक व जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे (अकोला), जिल्हा महिला अध्यक्षा इंदुताई मेश्राम, सरचिटणीस प्रज्ञा इंगळे, जिल्हा संघटक सुखदेवराव पाटील, जिल्हा कार्यालयीन सचिव सदाशिव मेश्राम, तालुका सरचिटणीस गोपाल खंडारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व आयोजक मंडळ उपस्थित होते.

Also Read : बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!

या धम्म परिषदेस परिसरातील हजारो उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. विविध शिबिरांमधून बौद्ध धम्माचे विचार, आचार आणि सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

Tags: Akola newsBuddhist communityBuddhist EventBuddhist teachingsBuddhist UnityCommunity EventDhamma AwakeningDhamma ConferenceDhamma TrainingMaharashtra newsMass GatheringPaturSamata SainikDalSocial EqualitySpiritual EventWomen Empowerment
Previous Post

‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

Next Post

वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

Next Post
वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप
बातमी

खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

by mosami kewat
April 9, 2026
0

पुणे : पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे जिल्हा परिषद शाळा ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्त्वावर खासगी कंपनीमार्फत चालवण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

April 9, 2026
पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

April 9, 2026
‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

April 9, 2026
बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!

बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!

April 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home