थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी, शुभचिंतक आणि अभ्यासक संविधानाच्या ७५ वर्षांचा उत्सव म्हणून “संविधान संवर्धन नाट्य जागर” साजरा करणार आहे.
भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. भारतीय संविधान हे स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेले जनमुक्तीचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लोकशाही व्यवस्थेचा मार्गदर्शक व सूत्र संचालक आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु स्वतंत्रता मिळवणारा देश अनेक जाती, धर्म, पंथ, संस्कृती आणि भाषांचे मिश्रण असलेल्या असंख्य विविधतांनी परिपूर्ण होता. अशा देशाला एकत्र ठेवण्यासाठी आणि भारतातल्या जनतेला मानवाधिकार, समता आणि समान न्यायाचा अधिकार देण्यासाठी संविधानाची रचना करण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीच्या मंथनातून बाहेर आलेले हे अमृत आहे.
संविधानाने २६ जानेवारी १९५० भारतातील जनतेला वर्णव्यवस्थेतून मुक्त केले आणि विधिसमंत प्रत्येकाला माणूस म्हणून समान अधिकार दिला. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या मध्यमवर्गाला विकासाचे गाजर दाखवून या धर्मांध वर्णवाद्यांनी भारतीय लोकशाहीत सत्ता काबीज केली आणि संविधानाच्या मूलभूत स्तंभांना उद्ध्वस्त करायला सुरुवात केली.
संविधानाच्या संरक्षणासाठी असलेल्या सर्व स्तंभांवर एकाधिकार गाजवला.निवडणूक आयोग, प्रशासन, कनिष्ठ न्यायालये, केंद्रीय तपास यंत्रणा आणि प्रसारमाध्यमं. धर्मांध वर्णवादी हुकूमशहाला विरोध करणाऱ्या मोजक्या लोकांना एकतर तुरुंगात टाकण्यात आले किंवा मारले गेले. एका विशिष्ट बहुल समुदायाला वेळोवेळी भडकावण्यात आले आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली महिलांची सार्वजनिकपणे त्यांच्या योनीत बोटे घालून जमावाकडून धिंड काढण्यात आली, त्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आणि संपूर्ण जगाने पाहिला.विचार करा, धर्मनिरपेक्षता, समता, समानता,बंधुता नसलेले संविधान म्हणजे काय? प्राणविहीन शरीरासारखा फक्त कागदाचा तुकडा. राजेशाही, मुघल राजवट आणि इंग्रजांचेही नियम आणि कायदे होते, पण संविधानाने प्रथमच सर्व भारतीयांना समान मानले आणि समान अधिकार दिले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे भारताला माता मानतात, जे महिलांची पूजा करतात, त्यांनी स्त्रीला माणूस मानले नाही, भारतीय संविधानाने त्या स्त्रीला माणूस म्हणून समान अधिकार दिला आहे.
धर्मनिरपेक्षता, समता, समता आणि बंधुत्वाशिवाय भारत जातीयवादी धर्मांध श्रद्धा, सूत्रे, सूक्ते आणि सत्ताधीशाच्या सनक वर चालेल आणि मणिपूर आणि जंतरमंतरची भयंकर दृश्ये जगभर व्हायरल होत राहतील. संविधानपूर्व भारतात आदिवासी, बहुजन आणि महिलां सोबत होत होते तेच होईल. म्हणूनच संविधानाला वाचवण्यासाठी व्यक्तिपूजा सोडून वर्णवादी आणि धर्मांध शक्तींना कंठस्नान घालून परास्त करणे आवश्यक आहे. उरल्या सुरलेल्या मानवतेच्या पुरस्कर्त्यांनी संघटित होऊन व्यापक प्रतिरोधाचा एल्गार देऊया जो सार्थक आणि संविधान वाचवण्यात यशस्वी होईल!
याच संदर्भात, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी, शुभचिंतक आणि अभ्यासक संविधानाच्या ७५ वर्षांचे औचित्य साधत “संविधान संवर्धन नाट्य जागर” साजरा करणार आहे. या नाट्य जागृत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक राजगती, गोधडी – आपली संस्कृती , लोक-शास्त्र सावित्री ही तीन नाटके संविधानाचे सिलॅबस म्हणून प्रस्तुत करणार आहोत.
नाटक : राजगती
राजगती हे नाटक राजकीय परिस्थिती बदलण्याचे सूत्र आहे. राजकीय नेतृत्वात आत्मबळ निर्माणासाठीचे विचारमंथन आहे. राजनीती घाण नसून मानवी कल्याणाची पवित्र निती आहे, हा उदघोष देऊन राजगती हे नाटक जनतेला राजकीय संभ्रमातून मुक्त करते आणि संविधानानुसार भारताचे मालक असण्याची ज्योत जागवते.
नाटक : गोधडी
गोधडी हे नाटक सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्धचे बंड आहे. वर्णवादमुक्त भारताची प्रतिज्ञा आहे. सांस्कृतिक शोषण, अस्पृश्यता, भाग्य आणि देव यांच्या चक्रात पिसलेल्या भारतीयत्वाला मुक्त करण्याची गाज आहे! गोधडी हे नाटक आपल्या मूळ संस्कृतीचा शोध आहे.
नाटक “लोक-शास्त्र सावित्री”
सावित्रीबाई फुलेंनी पितृसत्ता, सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. वर्णव्यवस्था आणि अज्ञानाच्या चौकटीतून संपूर्ण समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला. त्यांच्या संघर्षाची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ? जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे विचार रुजले नाहीत, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार !प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, शनिवारी २५ जानेवारी २०२५, सायंकाळी ५.३० वाजता, पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध, पुणे येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “गोधडी” या नाटकाची थिएटर ऑफ रेलेवन्स – संविधान संवर्धन नाट्य जागराची सुरुवात होणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, शनिवारी २५ जानेवारी २०२५, सायंकाळी ५.३० वाजता, पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध, पुणे येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “गोधडी” या नाटकाची थिएटर ऑफ रेलेवन्स – संविधान संवर्धन नाट्य जागराच्या पार्श्वभूमीवर होणार आहे.