मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्या लाडक्या बहीणी आयकर भरणाऱ्या आहेत त्या लाभार्थी महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. कारण त्यांच्या कुटुंबाची माहिती आता सरकारला मिळणार आहे. केंद्राकडून आता त्याला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या योजनेतील लाखो अपात्र लाडक्या बहिणीनां याचा फटका बसनार आहे.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे.तरी देखील अनेक अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या अनेक लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या. अशा बोगस लाडक्या बहिणींची सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली होती. आता प्राप्तिकर विभागाने देखील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या महिलांचा योजनेतील लाभ बंद होणार आहे. सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं, अशी अट घातली होती. मात्र, ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिला व बालकल्यान विभागाने अशा बोगस लाडक्या लाभार्थी बहिणींची शोधमोहिम सुरु केली आहे.