अकोला दि. २३ – अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या सहाय्य तातडीने जिल्हा परिषदेच्या पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना राबविण्या करीता आज वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची नियोजन बैठक घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले.पुढील काही दिवसात होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टी मुळे नदी नाल्याच्या काठावरील गावातील शाळा तातडीने पूरग्रस्त नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, आरोग्य यंत्रणा कामाला लागावी, बांधकाम विभागाचे वतीने शेत रस्ते आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले रस्ते, लघु सिंचन विभागाचे अखत्यारीत असलेले तलाव, बंधारे ह्याचा आढावा घेण्यात आला.सोबतच कृषी विभाग, पाणी पुरवठा विभाग,महिला बाल कल्याण आणि सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी ह्यांना नियोजन करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने ह्यांनी दिलेत.
ह्या आढावा आणि नियोजन बैठकीस वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष
डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर,
युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे,
जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,
जि प उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड,
महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,
समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट,
जि प गटनेते ज्ञानेश्वर सुलताने,
जि प सदस्य पुष्पाताई इंगळे, जि प सदस्य आम्रपालीताई अविनाश खंडारे,
जि प सदस्य विनोद देशमुख,
हिरासिंग राठोड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे प्रामुख्याने उपस्थित होते.
ह्यावेळी जिल्हा परिषदेचे जि प उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र., प्र.अधि. डि.आर.डि.ए.) सुरज गोहाड,
जि प प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग,
जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले,
जि प बांधकाम उप कार्यकारी अभियंता नेमाडे,
लघु सिंचन मुख्य कार्यकारी अभियंता बोके, ग्रा पा पुरवठा शाखा अभियंता तिडके,जि प कृषी अधिकारी इंगळे, पशुसंवर्धन अधिकारी दळवी, महीला व बालकल्याण अधिकारी मरसाळे हे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन विभागाचे किंवा महसूल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय ह्यांचे वर जबाबदारी टाकू नये आपण सर्वांनी स्वतः जबाबदारी घेऊन कामाला लागण्याचे आवाहन वंचित च्या पदाधिकारी ह्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी ह्यांना केले.