अकोला : आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला अधिक मतदान मिळवून देण्यासाठी आणि पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिलेल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील झोडगा (पूर्वीचे जनुना) सर्कलमध्ये पिंपळगाव हांडे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, ज्येष्ठ कार्यकर्ते सिंहासन जाधव, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढावू, संघटक अनुराधा ठाकरे,
तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, राहुल खाडे, अशोक लोणागरे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी आगामी निवडणुकीच्या तयारीवर भर दिला. तसेच, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून पक्षाची धोरणे व उद्दिष्ट्ये समजावून सांगण्यावरही बैठकीत चर्चा झाली.