मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांच्या नेतृत्वात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांसाठी दि. 24 मार्च पासुन Help Line 9960343434 सुरु करण्यात आली आहे. या हेल्प लाईनच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्या मार्फत हातावर पोट असणार्या, कामगार, मजुर, हमाल, एकल महिला, माथाडी कामगार यांच्या कुटुंबियांना किमान दोन आठवड्यांचे गहू, तांदुळ, दाळ, तेल आणि साबण ह्या जिवनावश्यक वस्तु घरपोच करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पर्यंत 3800 कुटंबाना दोन आठवड्यांचे राशन घरपोच पोचविण्यात आले आहे. व ही मदत पुढेही अविरतपणे चालु आहे. ज्यांचा हेल्प लाईनवर संपर्क होत नसेल त्यांनी आपल्या आपल्या भागातील वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संपर्क साधून मदतीचा निरोप देणे. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे वंचित बहुजन आघाडी व आम्ही सगळे पदाधिकारी मदतीसाठी तत्पर आहोत. याच उपक्रमांतर्गत टाउन हाॅल परिसरातील जयभिम नगर, येथील हातावर पोट असणार्या नागरिकांना गहू, तांदुळ, दाळ, तेल व साबण या 10/12 दिवस पुरतील एवढे जिवनाश्यक वस्तुंचे वाटप संदिप जाधव शहर ऊपाध्यक्ष (प) अमित भटकर युवा नेते यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुमित भुईगळ, छोटु ढेपे, किरण कांबळे, सचिन भुईगळ, चिंटु बेडेकर, मयुर जमधडे, ईश्वर गायकवाड, गोपिनाथ गंगावणे यांनी सहकार्य केले.