बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे आक्रोश आंदोलन
पुणे : दलित, भटके विमुक्त, ओबीसी, एस. बी. सी आणि मराठा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती हक्कासाठी एल्गार पुकारला आहे. सावित्रीमाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या समताभूमी ( फुलेवाडा) येथून २४ जून रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थी आक्रोश आंदोलन सुरू करणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप संदर्भातला प्रश्न मार्गी लावण्यात यावा ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे.
दलित, भटके विमुक्त, ओबीसी, एस. बी. सी आणि मराठा समाजातील सर्व विद्यार्थी, पालक, भारतीय संविधानाला मानणाऱ्या सर्व संस्था, संघटना, पक्ष आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी असणार आहेत.01:11 PM