गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा जोरदार फटका विदर्भ, मराठवाडा, उत्तर-महाराष्ट्रासह मुंबईला बसला आहे. हिंगोली, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, लातूर, जालना, उस्मानाबाद मध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावामधे पाणी शिरलं आहे. या अतिवृष्टीमुळे कापूस आणि आणि सोयाबीनच हाती आलेलं पीक हजारो शेतकऱ्यांनी गमावलं आहे.
अतिवृष्टीमुळे जळगाव, नंदुरबार, नाशिक मधे नद्यांना पुर आले असुन नाशिक मध्ये गंगापूर धरणाचा विसर्ग सुरु करण्यात येणार आल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला होता .जळगाव मध्ये बीड व लातूर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धनेगाव धरणातून मांजरा नदीत ७०००० क्युसेक पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले तसेच मध्ये मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडल्यामुळे ७८३९७ तर माजलगाव धरणाचे ११ उघडण्यात आल्यामुळे ८०५३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून मांजरा व सिंधफणा नदीच्या काठावरील गावांसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये यामुळे पूर सदृश्य निर्माण झाली असून शेतांमध्ये पुराचं पाणि शिरल्यामुळे शेतीच व विशेषतः सोयाबीनच मोठं नुकसान झालं आहे. बीड मधील केज, अंबेजोगाई, बीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरून परिस्थिती बिकट झाली आहे.
मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यामुळे उस्मानाबाद मध्ये अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. एनडीआरएफच्या बचाव पथकाने जवळपास ४९० लोकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नांदेडमधे पडला असुन विष्णुपुरी प्रकल्पाचे आठही दरवाजे उघडण्यात येऊन ८० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमधे पाणी शिरुन शेती व जनावारांचे मोठे नुकसान झाले.
हिंगोलीत मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कयाधू नदीला पूर येऊन पुराचं अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांच्या बचावासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करावे लागले. एनडीआरएफच्या बचाव पथकाने बोट व हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
राज्यात पावसाने आत्तापर्यंत ४३६ बळी घेतले असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.व जवळपास २५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, मूग, कापूस, फळबागांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.