अहमदनगर : साकत, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील पाण्याचे प्रमाण घटले असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच पिण्याचे, वापरण्याचे व जनावरांसाठी पाण्याची तातडीने सोय करावी, या मागणीसाठी ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव (वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक) यांच्या नेतृत्वाखाली शितलकुमार सावळे साहेब, जामखेड तहसीलदार व शुभम जाधव साहेब, गटविकास अधिकारी, जामखेड यांना निवेदन देण्यात आले. तसेच तात्काळ टँकर सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी अरुण (आबा) जाधव म्हणाले की, खरंतर महाराष्ट्रातील दुष्काळ ही एक गंभीर नैसर्गिक व सामाजिक समस्या आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विहिरी, तलाव, नद्या आणि धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी, शेती, जनावरांसाठी चारा आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे साकत ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी छबुबाई भानुदास पुलवळे, रुक्मिणी अरुण पुलवळे, सोजर संभाजी पुलवळे, काशिनाथ कुंडलिक पुलवळे, उषा दत्तात्रय मुरूमकर, राजूबाई मारुती मुरूमकर, गजराबाई मानमोडे, रुक्मिणी उत्तम मुरूमकर, मनीषा सरोदे, उषा सरोदे, छाया लहाने, शांताबाई जाळवे, सुषमा लहाने, मंगल वराट, मनोज वराट, ताई पुलवळे, बापू ओहोळ, संतोष चव्हाण, रजनी औटी, भक्ती पवार, पप्पू भालेराव आणि मच्छिंद्र जाधव उपस्थित होते.





