पलूस- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर* यांनी विविध समाजघटकांप्रती घेतलेल्या निर्णायक भुमिका व वर्षानुवर्षे वंचित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी व गरीब मराठा यांना राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घेतलेली भुमिका हीच भविष्यातील राजकारण व समाजकारणाची आवश्यकता असलेचे मान्य करून पलूस तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सांगली उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
यावेळी नवीन येणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून योग्य ती संधी देण्याची ग्वाही देऊन गायगवाळे यांनी सचिन इनामदार (दुधोंडी), अमोल पाटील (बुर्ली), आमिर मुल्ला (पलूस), राकेश सावंत (कुंडल), महेश लोखंडे (धनगाव) यांचा सत्कार करत पक्षप्रवेश करून घेतला.
यावेळी बोलताना जिल्हा महासचिव अमित वेटम म्हणाले कि, आपल्या जीवनमरणाचे निर्णय जर राजकीय पटलावरील प्रस्तापिथ 169 घराणी आलटून पालटून घेणार असतील तर हि महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची बाब नाही, आजच्या राजकारणाचा आणि राजकारण्यांचा पोत घसरू लागला असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील तरुण युवकांनी राजकारणात प्रवेश करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे असलेने राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या तरुणांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून राजकारण करावे.
पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित बनसोडे* म्हणाले कि, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी पलूस व कडेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना पक्षप्रवेश करून आणणार आहोत.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत डॉ. राजेश साठे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार जिल्हा सदस्य विनीत कांबळे यांनी केले. यावेळी शाम अवघडे, प्रशांत कोळी यांसह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.