बार्शी : तालुक्यातील मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहार येथे ७७वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक सलोखा आणि संविधानाचा जागर पाहायला मिळाला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर बुद्ध विहार परिसरात अंगणवाडी सेविका रतन शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिंदे यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा असा गौरव करून गावाने एक नवा आदर्श समोर ठेवला आहे.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लहान मुलांना खाऊ आणि पेन वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यात आला. यावेळी गावातील नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संघटक ज्ञानदेव सोनवणे गुरुजी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात रामलिंग सोनवणे (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, मांडेगाव), राजेंद्र जावळे (समता सैनिक दल), रमेश सोनवणे, गणेश चव्हाण, मंगल सोनवणे, सुखदेव सोनवणे, माणिक सोनवणे, गौतम सोनवणे आणि शीला सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.






