हिंगणघाट : ज्या संविधानामुळे भारत प्रजासत्ताक झाला, त्या संविधानाच्या निर्मात्याचे नाव महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात कुठेही घेतले नाही. हा प्रकार केवळ विसर नसून जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचे निवेदनात अश्विन तावडे म्हणाले.
नाशिक जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांकडून जोरदार आंदोलने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून, संबंधित घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. ( Vanchit bahujan aghadi)
नाशिक येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळून त्यांचा अपमान केला, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अश्विन तावडे यांनी म्हणाले. याप्रकरणी महाजन यांच्यावर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अश्विन तावडे यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
– मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ SC/ST Atrocities Act नुसार गुन्हा दाखल व्हावा.
– या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
– संविधान आणि संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कारवाई व्हावी.
“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. जर प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडेल,” असा इशारा अश्विन तावडे यांनी दिला आहे.






