Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध

mosami kewat by mosami kewat
January 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध
       
नांदेड : नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलन राज्यभरात करण्यात येत आहे. नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यासाठी धडक आंदोलन करण्यात येत आहे.

आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. हेडगेवार चौक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत गिरीश महाजन यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. (Vanchit bahujan aghadi)

नेमकी घटना काय?

२६ जानेवारी रोजी नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या शासकीय सोहळ्यात भाषण करताना त्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. एका जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्याकडून अशा प्रकारे महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे, असे म्हणत नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

या घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही उमटले आहेत. वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नायगाव येथील हेडगेवार चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “महामानवाचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (Vanchit bahujan aghadi)

या आंदोलनात बालाजी गायकवाड रातोळीकर (जिल्हा सचिव, वंचित युवा आघाडी), दीपक गजभारे (जिल्हा उपाध्यक्ष), साहेबराव कोपरेकर, सतीश वाघमारे, साईनाथ नामवाडे, भूषण काळेवार, राजू भद्रे, दीपक जमदाडे, प्रभाकर वाघमारे उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महामानवांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांनी माफी मागावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarGirish MahajanMaharashtramlanashikPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा; वंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Next Post

राजीनामा द्यावा! मंत्री गिरीश महाजनांविरोधात नागरिकांमध्ये संताप; गडचिरोलीत पेटले निषेधाचे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
January 27, 2026
0

पाचोरा: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळल्याचा, वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुक्याच्या वतीने मंत्री...

Read moreDetails
मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहारात ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहारात ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 27, 2026
संविधान निर्मात्यांचा अपमान सहन करणार नाही; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा अश्विन तावडे यांचा इशारा

संविधान निर्मात्यांचा अपमान सहन करणार नाही; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा अश्विन तावडे यांचा इशारा

January 27, 2026
राजीनामा द्यावा! मंत्री गिरीश महाजनांविरोधात नागरिकांमध्ये संताप; गडचिरोलीत पेटले निषेधाचे आंदोलन

राजीनामा द्यावा! मंत्री गिरीश महाजनांविरोधात नागरिकांमध्ये संताप; गडचिरोलीत पेटले निषेधाचे आंदोलन

January 27, 2026
महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध

महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध

January 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home