हिंगोली : “संविधानाची जाणच समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा खरा पाया आहे,” हा विचार जनमानसात रुजवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर यांच्या वतीने आयोजित ‘भारतीय संविधान विचार जागर’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूलतत्त्वांवर आधारित ही स्पर्धा शिरड शहापूर व परिसरातील विविध शाळांमध्ये घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, या हेतूने जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांनी या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले होते. त्यांच्या अथक परिश्रमातून आणि नेतृत्वाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
• जि. प. माध्यमिक शाळा: मनीषा शेषराव राठोड (प्रथम), पूजा साहेबराव पवार (द्वितीय), सुमित्रा मारुती बनसोडे (तृतीय)
• जि. प. उर्दू शाळा: आफ्रीम बाबा खान (प्रथम), इरम सय्यद असलम (द्वितीय), शिफा शेख शहादत (तृतीय)
• श्री शांती विद्या मंदिर: श्रेया अनिल कांबळे (प्रथम), समीक्षा मुंजाजी सरकटे (द्वितीय), अंजली पंजाब मस्के (तृतीय)
इयत्ता १० वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल ओमकार बेले आणि २०२४-२५ शैक्षणिक वर्षात ९३.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम आलेल्या श्रुती राम रावले हिचा विशेष ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. तसेच या प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी झालेल्या १००० विद्यार्थांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्यासह प्रा. डॉ. सुरेश शेळके, अॅड. मुस्ताक अहमद, संतोबा अंभोरे, आनंद ढेंबरे, जमशेद खान पठाण, हनीफ पठाण, श्यामसुंदर ठोंबरे, यशवंत कांबळे, नारायण सूर्यतळ उपस्थित होते. तसेच जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ढगे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जाविद, शालेय समिती अध्यक्ष स. असलम, शांती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक काळे व शिक्षकवृंद आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“वंचित बहुजन आघाडी केवळ राजकारणच नाही तर समाजकारण आणि संविधानिक मूल्ये रुजवण्याचे काम सातत्याने करत राहील,” असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांनी व्यक्त केला.






