सांगली : आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन समाजाने विकासाभिमुख कामे करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (VBA) च्या उमेदवारांना मतदान करून त्यांना विजयी करावे, असे आवाहन VBA चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तासगाव येथे केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
प्रस्थापित राजकीय पक्ष केवळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यातून पैसे कमवण्यासाठीच काम करत आहेत, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केला. वंचित बहुजन समाजाने आता विकासाची कामे करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपचे १०० नगरसेवक घोषित होत असतील, तर हा लोकशाहीला मोठा धोका आहे, असे मतही सुजात आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्यावतीने आगामी निवडणूक एकत्रितपणे लढवून विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
माजी खासदार संजय काका पाटील यांनी देखील वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






