मुंबई : नाशिक जिल्ह्यातील बहुजन, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील विविध कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मुंबईतील राजगृह येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विविध समाजघटकांतील कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सामाजिक न्याय, समता आणि घटनात्मक मूल्यांच्या लढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली.
वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर!
या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.





