पुणे : कोथरूडयेथील पोलीस स्टेशनमध्ये महिलांसोबत घडलेल्या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या अन्यायाविरोधात पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी 28 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टामार्फत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाची पहिली सुनावणी 3 सप्टेंबर 2025 रोजी शिवाजीनगर न्यायालय, पुणे येथे पार पडली होती. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आलेली होती.
‘किसी पिंजरे में कैद ना होगा’ फेम गायक संदीप पवार यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा तसेच संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवला होता.
या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर आणि जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर तसेच कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले होते. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेले नाही.






