Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष चळवळीचा दस्तऐवज

बाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 14, 2021
in चळवळीचा दस्तऐवज
0
बाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय
       

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे स्वप्नद्रष्टे होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी काही स्वप्न बघितली ती पूर्ण करण्यासाठी जीवाचें रान केलं. आपल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या ज्ञातीतील लोकांच्या सुधारणेविषयी उन्नतीची त्यांना अनेक स्वप्ने पडत होती. त्यातीलच एक स्वप्न होतं या लोकांकरिता एक प्रशस्त महाविद्यालय असलं पाहिजे जेणेकरून शिक्षणामुळे त्यांच्यातील अज्ञानमूलक भोळ्या समजुती नष्ट होतील आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, त्यांची पिळवणूक कुणीही करणार नाही. नुसत्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाने सामाजिकदृष्ट्या प्रगती होतं नाही. तर उच्च शिक्षणामुळे होणारा सर्वात मोठा फायदा हा की त्यांच्यांत आत्मविश्वास निर्माण होईल व हाच आत्मविश्वास त्यांच्या उन्नतीची पहिली पायरी होय.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात आपल्या लोकांसाठी एक महाविद्यालय असलं पाहिजे हे खूप वाटत होतं अनेक वर्षे त्यांच्या मनात हे वादळ निर्माण झाले होते. या महाविद्यालयातून अनेक क्षेत्रांतील नेते निर्माण होतील, अशी आशा त्यांना होती. यासाठी ते योग्य काळाची आणि संधीची वाट पाहत होते ती त्यांना मिळाली १९४४-४५ या सालात.

मुंबईत दर वर्षी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच होती. ती १९४४ साली ४१००० एवढी झाली. या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी महाविद्यालय कमी पडू लागली. अनेक नवीन महाविद्यालय निर्माण होवू लागली, पण ती मुंबई शहाराच्या बाहेर. मुंबईत या काळात एकही महाविद्यालय निघालं नाही. त्यामुळे जी काही महाविद्यालय होती ती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात असमर्थ होती.

ती योग्य वेळ पाहून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी २० जून १९४६ रोजी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.

सुरवातीच्या काळात सिद्धार्थ महाविद्यालय हे मरीन लाइन्स येथील बॅरेक मध्ये भरत होते.  १९४६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती.

सिद्धार्थ महाविद्यालयाने अनेक बाबतीत विक्रम केला आहे त्यापैकी काही विक्रम हे सांगितले पाहिजे.

मुंबई विद्यापीठांशी संलग्न झालेल्या महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिले महाविद्यालय हे सिद्धार्थ महाविद्यालय आहे. जेव्हा सिद्धार्थ महाविद्यालय सुरू झालं तेव्हा पहिल्याच वर्षी B.A व B.Sc पर्यंत सर्व वर्ग उघडण्यात आले. इतर महाविद्यालयात अशी पद्धत नव्हती ते प्रथम दोन वर्ग सुरू करतं तो ही दुसरा वर्ग हा रिकामाच असे. नंतर दर वर्षी एक एक वर्ग वाढवत. सिद्धार्थ महाविद्यालयाने ही पुराण परंपरा मोडीत काढून संपूर्ण महाविद्यालय म्हणून जन्म घेतला. हा पहिला विक्रम.

सिद्धार्थ महाविद्यालयाने जन्म घेतला तो बालक म्हणून नाही तर चांगला सशक्त तरुण म्हणून. पहिल्याच वर्षात सिद्धार्थ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या ही १४०० च्या वर गेली होती. जी महाविद्यालयाच्या इतिहासातील विक्रमी संख्या आहे हा इतिहास त्याकाळी दुसऱ्या कोणत्याही महाविद्यालयात घडला नाही. हा दुसरा विक्रम.

भारत हा स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता.  कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राला संरक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असलेच पाहिजे. ते सामर्थ्य म्हणजे भू सेना, नौ सेना आणि वायू सेना. भारताचे संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंह यांनी घोषणा केली होती, विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सैनिक शिक्षण घेतलं पाहिजे. त्यावेळी University Officer’s Training Corps ही संस्था स्थापन केली. (आजची NCC.)

या कोअरची संख्या मर्यादित असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना इच्छा असूनही त्यांना कोअर मध्ये प्रतिनिधित्व मिळाले नाही ; परंतु सिद्धार्थ महाविद्यालयाने पहिल्याच वर्षी एक पथक स्थापन केले. हा तिसरा विक्रम.

तसेच चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विक्रम म्हणजे. शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांना विश्वविद्यालयात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्याकाळी कला शाखेचे वर्ग सकाळी ७:३० ते १०:४५ या वेळेत भरत जेणेकरून या वेळेत आपल्या वर्गांना उपस्थित राहून नंतर आपापल्या सेवेसाठी जाणं हे नोकरी करणाऱ्यांना शक्य होतं. असे शिक्षण घेणारे त्याकाळी ६००च्या वर नोकरीपेशा विद्यार्थी होते जे नंतरच्या काळात मोठे अधिकारी झाले.

————————————————————————–

(डावीकडून) प्रा. व्ही.जी. राव, सी. एन्. मोहिते गुरुजी, उपप्राचार्य एच.आर. कर्णिक, कमलाकांत चित्रे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, म. भि. चिटणीस आणि प्राचार्य व्ही. एस्. पाटणकर.

– सुभाष वानखेडे


       
Tags: aurangabadbabasahebambedkarbabasahebmemoriessiddharthcollegesubhashwankhede
Previous Post

आंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव

Next Post

आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स

Next Post
आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स

आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
बातमी

बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

by mosami kewat
July 26, 2025
0

खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...

Read moreDetails
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

July 26, 2025
कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे ‘थाळी बजावो’ आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

July 26, 2025
बीडमध्ये 'होडी चलाव' आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बीडमध्ये ‘होडी चलाव’ आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 26, 2025
"केवळ गोरंट्याल नव्हे; राष्ट्रवादीचेही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा"

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home