Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ड्रग्सवर कारवाई न करण्याच्या सूचना केंद्रातून कोणी दिल्या?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 9, 2024
in राजकीय
0
ड्रग्सवर कारवाई न करण्याच्या सूचना केंद्रातून कोणी दिल्या?
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल

मुंबई : ड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा होत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावं की, त्यांना केंद्रातील कोणत्या मंत्र्यांकडून सूचना आहे की, यावर कारवाई करू नये?  असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. हे ड्रग्स कमी किमतीचे नाहीत, तर दहा हजार कोटींचे हे ड्रग्स असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, १९९३ मध्ये ब्लास्ट झाला त्यावेळी ड्रग्सचा पैसा वापरण्यात आला होता. ड्रग्सचा जो व्यवहार चालला आहे तो एक संघटित गुन्हा आहे आणि दहशतवादाशी संबंधित आहे. २०२१ मध्ये मुंब्रा पोर्टवर एनआयएमार्फत नार्कोटीक्स सिझ झाले होते. त्याच्यामध्ये अतिरिक्त चार्जशीट दाखल करण्यात आली. त्या अतिरिक्त चार्जशीटमध्ये एनआयएने सिद्ध केले आहे की, ड्रग्सचा पैसा हा लष्कर- ए – तोयब्बा या संघटनेसाठी पुरवला गेला होता.

मध्यंतरी एक बातमी आली होती की, पोर्टवर १८ हजार कोटींचे ड्रग्स सापडले होते. हे ड्रग्स कोणत्या एजन्सीच्या ताब्यात आहेत ?  नार्कोटीक्सच्या ताब्यात आहेत, एनआयएच्या ताब्यात आहे, ईडी की सीबीआयच्या ताब्यात आहे याची कुठेही माहिती मिळत नाही. हा दहा हजार कोटींचा ड्रग्स साठा नाशिक – लोणावळा येथे आहे. तो यापैकी आहे का ? याचा खुलासा झाला पाहिजे. तरुण पिढी याला बळी पडत आहे या मुद्याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधले.

ड्रग्स तस्करीचा मोठा प्रयत्न भारतात झाला आहे. मुशर्रफ यांनी पाकिस्तानातील सत्ता जेव्हा हातात घेतली आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले नव्हते त्याआधी युद्धजन्य परिस्थिती भारतासोबत झाली होती. त्या दरम्यान त्यांचे विधान होते की, ते दहा दिवसांचा निधी युद्ध लढण्यासाठी देतील.असे त्यांनी म्हटले.

कारवाई का झाली नाही, जनतेला सांगा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्स प्रकरणावर कारवाई का झाली नाही याची माहिती जनतेला सांगावी, अशी मागणीही त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली.


       
Tags: bjpDevendra FadanvisdrugsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ही वेळ माणुसकी आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची !

Next Post

काँग्रेसच्या साजिद पठाण खानविरोधात तक्रार दाखल

Next Post
काँग्रेसच्या साजिद पठाण खानविरोधात तक्रार दाखल

काँग्रेसच्या साजिद पठाण खानविरोधात तक्रार दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!
बातमी

अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!

by mosami kewat
January 24, 2026
0

ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची 'रंगीत तालीम' व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय,...

Read moreDetails
उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक!

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक!

January 23, 2026
फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माधिष्ठित राजकारणाची घुसखोरी ?

फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माधिष्ठित राजकारणाची घुसखोरी ?

January 23, 2026
वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

January 23, 2026
काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

January 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home