]]>
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; रेणापूर–उदगीर महामार्गावर अखेर गतिरोधकांची उभारणी
https://eprabuddhbharat.com/renapur-udgir-highway-gets-speed-breakers-after-vanchit-bahujan-aghadis-protest-and-follow-up/
Fri, 30 Oct 2026 05:44:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20762रेणापूर : रेणापूर–उदगीर महामार्गावरील रेणापूर ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, न्यायालय व विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. या मार्गावर गतिरोधक उभारण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गुरुवारी (दि.२९) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी गतिरोधकांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला […]
]]>रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ; पन्नेश्वर शुगर मिल्सचा पाणीउपसा सुरूच !
https://eprabuddhbharat.com/renapur-dam-water-reserved-for-drinking-panneshwar-sugar-mill-continues-water-extraction-amid-drought-concerns/
Sun, 25 Oct 2026 12:34:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20629रेणापूर : रेणापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, सिंचनासाठीचा पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाने परिसरातील रोहित्रांचा वीजपुरवठाही खंडित केला आहे. असे असतानाही, पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याचा प्रकल्पातून पाणीउपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. यंदा प्रकल्प परिसरात अपुऱ्या पावसामुळे धरणात केवळ २०.८६ टक्के […]
]]>वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-observes-mandal-vijay-diwas-as-social-justice-and-equality-day-in-renapur-taluka/
Fri, 07 Aug 2026 13:22:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19267रेणापूर : मंडल आयोग हा भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या आयोगामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग खुला झाला. त्याचबरोबर आरक्षण, सामाजिक समता, गुणवत्तावाद आणि समान संधी यांवरील राष्ट्रीय चर्चेलाही या आयोगामुळे मोठी चालना मिळाली. मंडल आयोग (Mandal Commission) हा भारतातील सामाजिक व […]
]]>ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली
https://eprabuddhbharat.com/veteran-ambedkarite-activist-uttam-shankarrao-acharya-passes-away-vanchit-bahujan-aghadi-pays-tribute/
Wed, 17 Jun 2026 06:09:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18274रेणापूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते, भारिप बहुजन महासंघाचे रेणापूर तालुक्याचे पहिले अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे माजी कर्मचारी उत्तम शंकरराव आचार्य यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. उत्तम आचार्य हे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू, प्रामाणिक आणि खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. १९९२ मध्ये […]
]]>सिंधगाव येथे मुस्लिम समाजाची वंचित बहुजन आघाडीसोबत बैठक
https://eprabuddhbharat.com/muslim-community-in-sindhgaon-holds-meeting-with-vanchit-bahujan-aghadi/
Sat, 27 Sep 2025 06:57:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10527लातूर : रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथे मुस्लिम समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांना आमंत्रित करून बैठक आयोजित केली. या बैठकीत सलीम सय्यद यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कब्रस्तानाचा प्रश्न मांडला. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांनी हा प्रश्न सोडवू असे आश्वासन […]
]]>लातूरमधील रेणापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/renapur-vba-taluka-office-inauguration-latur/
Tue, 09 Sep 2025 09:22:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9808लातूर : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) रेणापूर येथील संवाद दौरा आणि तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. युवक आघाडीचे प्रदेश सदस्य अमोल लांडगे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांनी भूषवले, तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर, […]
]]>रेणापूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-renapur-taluka-committee-holds-successful-meeting/
Fri, 05 Sep 2025 07:06:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9623लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या रेणापूर तालुका कार्यकारिणीची बैठक व्हटी (ता. रेणापूर) येथे पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत सदस्य नोंदणी मोहिम, युवा व महिला आघाडीच्या शाखा स्थापन करणे, प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बुथ एजंट नेमणे तसेच तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीत गावागावातून दोन प्रतिनिधींचा समावेश करण्याचे ठरविण्यात आले. तसेच विविध शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या […]
]]>जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज: पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-gears-up-for-zilla-parishad-and-panchayat-samiti-elections-important-meeting-held/
Mon, 21 Jul 2025 06:21:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7960रेणापूर : लातूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी आणि संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्यासाठी रेणापूर तालुका आणि शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा विजय खेचून आणण्यासाठी विविध […]
]]>Latur : वंचित बहुजन आघाडीकडून रेणापूर येथे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-submits-various-demands-to-tehsildar-in-renapur/
Wed, 25 Jun 2025 11:21:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7020लातूर : वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्याच्यावतीने रेणापूर तहसील कार्यालयात विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा डेटा, सामाजिक न्याय विभागाचा निधी आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत – १) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक ७६ लाख मतदान आले कोठून याचा […]