]]>
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/dhammachakra-pravartan-din-vanchit-bahujan-yuva-aaghadi-initiatives-aurangabad/
Sat, 04 Oct 2025 12:09:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10878औरंगाबाद : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.या विशेष उपक्रमांत युवा जोडो अभियान, महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात मिळवण्यासाठी स्वाक्षरी अभियान तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवक-युवतींनी स्वाक्षरी करून व रक्तदान करून आपले योगदान नोंदविले.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष […]
]]>धम्मचक्र गतिमान करूया…!
https://eprabuddhbharat.com/dhammachakra-pravartan-day-babasaheb-ambedkar-social-revolution/
Sat, 04 Oct 2025 11:08:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10873-धनंजय कांबळे १४ ऑक्टोबर १९५६ हा भारतीय इतिहासातील एक अद्वितीय दिवस. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि भारतीय समाजजीवनात अभूतपूर्व परिवर्तनाची दिशा ठरवली. आज या ऐतिहासिक घटनेला साडेसहा दशकांहून अधिक काळ लोटला आहे; मात्र तिच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांचा मागोवा घेतला तर ती अजूनही प्रासंगिक ठरते. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराचा […]
]]>‘आम्ही गर्वाने आंबेडकर म्हणतो’: उत्कर्षा रुपवते यांचा अमित शहांना अकोल्यातून प्रतिउत्तर; वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्यावरही जोर
https://eprabuddhbharat.com/utkarsha-rupwate-slams-amit-shah-ambedkar-pride-akola-rally/
Sat, 04 Oct 2025 09:06:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10854अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्हाला नरकातून बाहेर काढणारा आमचा बाप आंबेडकर होता, म्हणून आम्ही गर्वाने आंबेडकर म्हणतो, अशा शब्दांत राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी अमित शहा यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. उत्कर्षा […]
]]>महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काँग्रेस-भाजपवर वंचित बहुजन युवा आघाडीचा हल्लाबोल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘वंचित’चा लढा कायम ठेवण्याचा निर्धार
https://eprabuddhbharat.com/vbya-attack-on-congress-bjp-over-mahabodhi-temple-vba-pledges-farmers-struggle/
Sat, 04 Oct 2025 07:45:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10846अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना धारेवर धरले. महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावरून काँग्रेस-भाजप या दोन्ही पक्षांना जबाबदार धरण्यात आले, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि हमीभावासाठी ‘वंचित’ पक्ष आपला लढा अधिक तीव्र करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. […]
]]>औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात! २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी महाविहार
https://eprabuddhbharat.com/aurangabad-bhimsagar-buddha-leni-dhammachakra-pravartan-day-celebration/
Fri, 03 Oct 2025 10:21:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10788औरंगाबाद : ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त औरंगाबाद येथील बुद्ध लेणी परिसरात सकाळपासूनच भीमसागर उसळला होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांतील लाखो उपासक-उपासिकांनी तथागत गौतम बुद्ध आणि धम्माची दीक्षा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोभावे स्मरण करत जयजयकार केला. जनसागर, सेवाभाव आणि अंधारलेली वाट दरवर्षीप्रमाणेच बुद्ध लेणी परिसर या दिवशी खास नटला होता. परिसरामध्ये शेकडो पुस्तकांची दुकाने […]
]]>नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप
https://eprabuddhbharat.com/nashik-vanchit-bahujan-yuva-aghadi-organizes-annadan-at-trirashmi-leni-on-dhammachakra-pravartan-day/
Fri, 03 Oct 2025 08:12:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10783नाशिक : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात दिवसभर अन्नदान करण्यात आले. महानगर महासचिव दीपक पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी या अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन युवा आघाडीच्या […]
]]>अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/akola-historic-dhamma-melava-prabuddh-bharat-stall-inaugurated-by-sujat-ambedkar/
Fri, 03 Oct 2025 08:00:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10778अकोला : तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याला आज अकोल्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यभरातून हजारो अनुयायी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत आहेत. या धम्म मेळाव्यात विविध प्रकारच्या साहित्यांचे, विशेषतः बौद्ध साहित्य आणि सामाजिक विषयावरील पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे. यामध्ये ‘प्रबुद्ध भारत’ या […]
]]>अकोल्यात आज होणार ऐतिहासिक धम्म मेळावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/historic-dhamma-rally-akola-2025-prakash-ambedkar-guidance/
Fri, 03 Oct 2025 06:53:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10769अकोला : अकोल्यात आज सायंकाळी ६ वाजता क्रिकेट क्लब मैदान, रेल्वे स्टेशन रोड येथे होणाऱ्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याची सर्वत्र उत्सुकता आहे. तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेला हा मेळावा धम्म, समता आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व मानला जातो. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक ॲड. बाळासाहेब आंबेडकर असून त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सामाजिक […]