Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रशासनात खळबळ: नवी मुंबई महापालिका मुख्यालयातच एसीबीचा सापळा; अधिकाऱ्याला 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

mosami kewat by mosami kewat
April 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रशासनात खळबळ: नवी मुंबई महापालिका मुख्यालयातच एसीबीचा सापळा; अधिकाऱ्याला 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
       
Anti Corruption Bureau : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना 42 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर झालेली ही पहिलीच थेट कारवाई मानली जात आहे. (Anti Corruption Bureau)

मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराचे प्रलंबित देयक मंजूर करण्यासाठी डॉ. गायकवाड यांनी लाचेची मागणी केली होती.

ऐरोली परिसरात 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल थकीत होते. त्यापैकी 21 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी गायकवाड यांनी दोन टक्के रक्कम लाच म्हणून मागितल्याचा आरोप आहे. (Anti Corruption Bureau)

कंत्राटदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने महापालिका मुख्यालयात सापळा रचला. गायकवाड यांच्या केबिनमध्येच ही कारवाई करण्यात आली आणि 42 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.

विशेष म्हणजे, अतिक्रमण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. गायकवाड यांनी शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेसाठी साहित्य व कामगार कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले होते. मात्र आता त्याच कामाच्या बिल प्रक्रियेत लाच मागितल्याच्या आरोपामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Anti Corruption Bureau)

या प्रकरणानंतर डॉ. गायकवाड यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले.

Tags: Anti Corruption BureauCorruptionDeputy commissionernavi delhi
Previous Post

हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !

Next Post

भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा

Next Post
भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा

भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 31, 2026
0

पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...

Read moreDetails
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home