Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आमदार सुनील कांबळे यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; वंचित बहुजन आघाडीने नोंदवला गुन्हा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 5, 2024
in बातमी
0
आमदार सुनील कांबळे यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; वंचित बहुजन आघाडीने नोंदवला गुन्हा !
       

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी यांना मारहाण केल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आणि माथाडी कामगार आघाडीच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या करिता आज पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले.

सदर विषय अत्यंत गंभीर असून दिनांक ५जानेवारी रोजी ससून रुग्णालय पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी व्यासपीठावरून उतरत असताना सेवेत असलेल्या बंडगार्डन पोलीस स्टेशनचे कर्मचारी शिवाजी सरक हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना चापट मारली. सदरील घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर या घटनेची दखल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घेत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच आमदार सुनील कांबळे यांच्यावर मारहाण करणे व पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परवृत्त करणे या गुन्ह्यानुसार योग्य त्या कलमान अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले.

यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व कामगार जनरल युनियनचे अध्यक्ष विशाल कसबे, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहराध्यक्ष सोमनाथ पानगावे , माथाडीचे सरचिटणीस ओमकार कांबळे, सचिव अभिजीत बनसोडे, सचिव चंद्रकांत कांबळे, शहर सदस्य सचिन शिंदे, उपाध्यक्ष वडगाव शेरी विधानसभा बाळासाहेब बनसोडे, संघटक पुणे शहर युवा विशाल साळवे, महासचिव संदेश कांबळे , पुणे शहर संघटक रफिक शेख, पुणे शहर प्रवक्ते, पुणे शहर युवा उपाध्यक्ष अजित वाघमारे, पुणे शहर युवा महासचिव शुभम चव्हाण, अरविंद कांबळे, महेंद्र एरलल्लू, मिलिंद बनसोडे,कृष्णा मोरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


       
Tags: bjppunesunil kambleVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

अकोल्यात मुस्लीम बांधवांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश !

Next Post

… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?

Next Post
… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?

... तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रस्थापितांविरोधात लढा देणारे नेतृत्व हरपले: विठ्ठलराव वाकडे यांचे निधन; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांकडून सांत्वन
बातमी

प्रस्थापितांविरोधात लढा देणारे नेतृत्व हरपले: विठ्ठलराव वाकडे यांचे निधन; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांकडून सांत्वन

by mosami kewat
October 25, 2026
0

अकोला : भारिप बहुजन महासंघाचे निंबा लोहारा सर्कलचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव वाकडे यांचे दुःखद निधन झाले. प्रस्थापितांविरोधात संघर्ष...

Read moreDetails
रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ; पन्नेश्वर शुगर मिल्सचा पाणीउपसा सुरूच !

रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ; पन्नेश्वर शुगर मिल्सचा पाणीउपसा सुरूच !

October 25, 2026
अमेरिका, रिलायन्स आणि जामनगर: भू-राजकीय घडामोडींचा नवा अन्वयार्थ

अमेरिका, रिलायन्स आणि जामनगर: भू-राजकीय घडामोडींचा नवा अन्वयार्थ

October 25, 2026
मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी २८ ऑक्टोबरला 'ज्ञानेश कुमार हटाव' मोर्चा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी २८ ऑक्टोबरला ‘ज्ञानेश कुमार हटाव’ मोर्चा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

October 25, 2026
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी निष्पक्षपणे होईल का?

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी निष्पक्षपणे होईल का?

October 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home