Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वर्ध्यातील महासभेसाठी मैदान हाऊसफुल्ल

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 18, 2024
in राजकीय
0
वर्ध्यातील महासभेसाठी मैदान हाऊसफुल्ल
       

ओबीसी बांधवांसह हजारो नागरिकांची तुफान गर्दी !

.वर्धा : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वर्धा येथील बोरगाव मेघे क्रिकेट मैदान गणेश नगर येथे आज महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वीच मैदानावर नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे. या सभेत बाळासाहेब आंबेडकर काय बोलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

मी पारधी, मी ख्रिश्चन, मी इसाई, मी पारशी, मी मुस्लीम, मी होलार, मी लोहार, मी मतदार, मी शिकलगार, मी जैन, मी शीख, मी हिंदू, मी हटकर, मी धोबी, मी गवंडी  इत्यादी जात समुहांच्या नागरिकांनी वर्ध्यातील महासभेला उपस्थिती लावली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या सभा राज्यातील अनेक जिल्ह्यात होत आहेत. या सभांना लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत. मुंबई, नागपूर, सांगली, बीड, अमरावती, जळगाव, नाशिक याठिकाणी वंचितच्या रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्या आहेत. ओबीसी, गरीब मराठा, मुस्लीम, दलित, आदिवासी आणि राज्यातील वंचित समुहांनी मोठ्या प्रमाणात सभांना हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेच्या विश्वास असल्याचे चित्र सध्या त्यांच्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचे चित्र नक्की बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुण्यातील सभेचीही उत्सुकता –

पुण्यात देखील 27 फेब्रुवारी रोजी बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता परिवर्तन महासभा होणार आहे. या सभेअधीच पुण्यात म्हाविकास आघाडीची सभा होणार असल्याने बाळासाहेब आंबेडकर काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होण्याची दाट शक्यता असून वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास राज्यात आणि देशातही सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे बोलले जात असून या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


       
Tags: Mahaellagar sabhaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadiwardha
Previous Post

लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा – वंचित बहुजन आघाडी.

Next Post

आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर

आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!
बातमी

मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

by mosami kewat
September 21, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर ने 1 अक्टूबर को मुंबई में आयोजित किए जाने...

Read moreDetails
भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

September 21, 2026
शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

September 21, 2026
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

September 21, 2026
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home