Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

अकोला म्हणतोय “ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर”

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 13, 2024
in Uncategorized
0
अकोला म्हणतोय “ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर”
0
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

शहरात लाल रंगाच्या बॅनरने जनतेचे वेधले लक्ष !

अकोला : महाराष्ट्रात फोडाफाडीचे राजकारण सुरू असताना. संपूर्ण अकोला शहर लाल रंगाने न्हावून निघाले आहे. व्हॅलेंनटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे प्रतिक असलेल्या लाल रंगांचे बॅनर्स शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर दिसत असून बॅनर्सवर ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर असा मजकूरही आहे. त्यामुळे या लाल रंगाच्या बॅनरची चर्चा अकोल्यात होताना दिसत आहे.

या लाल रंगातून व्हॅलेन्टाईन डेच्या प्रेमाचा संदेश तर आहेत. यातून काही राजकीय संदेश आहे का? याची सुद्धा चर्चा आहे. शिवाय महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत असल्याचे दिसून येत आहे. कारण, त्यांच्या बॅनर्सवर ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर अशा आशयाचे वेगवेगळ्या आशयाचे बॅनर्स ही छायाचित्रांसह संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आशयाचा अंदाज हेरला असून अकोल्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशालादेखील बाळासाहेबांसारख्या निर्भिड नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा होत आहे.

याआधी देखील त्यांचे बॅनर्स अकोला शहरात त्यांच्या छायाचित्रांसह झळकले होते. मात्र, त्यावेळी बॅनर्सवर अकोला में तो बस प्रकाश आंबेडकर चल रहे हैं, हिम्मतवाला, यही है राईट चॉईस, जिंदा बंदा, निडर – बेखौफ – बेबाक, असा आशय होता.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर देखील राज्यभर दौरे आणि सभा करत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हटलं की, चर्चा होते अकोला लोकसभा मतदारसंघाची. याच मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘नया साल, नया खासदार’ अशा आशयाचे बॅनर लागले होते. आता पुन्हा अशाच प्रकारचे बॅनर्स अकोल्यातील जठार पेठ, सिव्हिल लाईन चौकात लागले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने अकोला मतदारसंघाची बांधणी मजबूतरित्या केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत दररोज पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे दिसत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात बदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेमध्ये आहे.

या बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी अकोल्यात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सबंध राज्यभर एवढ्या मोठ्या सभेची चर्चा रंगली होती.


       
Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बाळासाहेबांच्या लढ्याला चिमुकलीची साथ

Next Post

जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी

Next Post
जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी

जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी

महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप
बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त ...

June 28, 2025
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎
बातमी

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित ...

June 28, 2025
राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎
बातमी

राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎

लातूर- देशाचा सुजान नागरिक घडवायचा असेल तर आज धम्माची गरज आहे. जगाची प्रगती ही धम्म विचाराने झाली आहे. जगात जे ...

June 28, 2025
आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास
बातमी

आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास

मुंबई - डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या जगात सायबर सुरक्षेचे धोके किती गंभीर असू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आदित्य ...

June 28, 2025
Jalna Road Construction : सरकटे वझर ते वाटूर रस्त्याचे निकृष्ट काम; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पोलखोल!
बातमी

सरकटे वझर ते वाटूर रस्त्याचे निकृष्ट काम; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पोलखोल!

जालना - मंठा तालुक्यातील सरकटे वझर ते वाटूर या मार्गावर बेलोरा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा आढळून ...

June 28, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क